येत्या 2 दिवसांत मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज

  Mumbai
  येत्या 2 दिवसांत मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज
  मुंबई  -  

  येत्या 2 दिवसांत मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली असून कोकणासह मुंबईतही पाऊस सक्रिय झाला आहे. मुंबईतल्या दादर, माटुंगा, गोरेगाव या परिसरात पावसाने शनिवारी सकाळीच हजेरी लावली. त्यामुळे पुढच्या दोन दिवसांत मुंबईसह राज्यात पावसाचे जोरदार आगमन होईल, असे हवामान खात्याकडून वर्तवण्यात आले आहे. पावसासह सर्तकतेचा इशाराही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

  गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेले मुंबईकर पावसाची चातकाप्रमाणे वाट बघत होते. पावसाच्या आगमनामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मान्सून महाराष्ट्रात पुढे सरकला असल्याचेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान करावे लागले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.