मुसळधार पावसामुळं गौरी-गणपती विसर्जनात अडथळे


SHARE

गौरी विसर्जनाच्या दिवशी मुंबईसह उपनगरात जोरदार पावसानं झोडपलं आहे. अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. पश्चिम उपनगरातील दहिसर, बोरिवली, गोरेगाव परिसरात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. 

जोरदार पाऊस

शनिवारी दुपारनंतर पावसानं जोर पकडला आहे. मुंबईतील हिंदमाता, परळ, किंग्ज सर्कल, सायन, माटुंगा आणि लालबाग परिसरात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी गौरी-गणपतीचं विसर्जन केल जात आहे.

बाप्पाचं विसर्जन उशिरानं 

यावेळी गणेश भक्तांना पावसात भिजून ओल चिंब होऊन बाप्पाला निरोप द्यावा लागतो आहे. तसेच, वाजत-गाजत बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढणाऱ्या भाविकांना मोठ्या अडथळ्यांना समोर जाव लागत आहे. त्याशिवाय, अनेकांनी पावसाचा जोर पाहून बाप्पाचं विसर्जन उशिरानं करण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या