Advertisement

मुंबईत परतीच्या पावसाची दमदार हजेरी


मुंबईत परतीच्या पावसाची दमदार हजेरी
SHARES

29 ऑगस्टच्या महापुरानंतर दडी मारुन बसलेला पाऊस पुन्हा एकदा मुंबईत सक्रिय झाला आहे. मुंबईत मंगळवारी मध्यरात्री पावसाने अचानक हजेरी लावली. विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस मुंबईसह उपनगरात कोसळला.

विजेच्या कडकडाटामुळे मुंबईकरांची झोप उडाली. मध्यरात्री 2.30 च्या सुमारास कोसळलेल्या पावसाने सकाळी 5 च्या दरम्यान विश्रांती घेतली. खरेतर हवामान विभागाने येत्या 3 ते 4 दिवसांत परतीचा पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता. पण, हवामान विभागच्या अंदाजाला पुन्हा एकदा हुलकावणी देत पावसाने मुंबईसह उपनगरांत दमदार एन्ट्री घेतली.

गेल्या 4 दिवसांपासून मुंबईकर उकाड्याने त्रस्त झाले होते. पण, मंगळवारी पडलेल्या पावसामुळे मुंबईकरांना थोडासा का होईना दिलासा मिळाला आहे. बुधवारी सांताक्रूझमध्ये कमाल तापमान 23.6 अंश सेल्सिअस तर, कुलाबा वेधशाळेत कमाल तापमान 23.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे.

सांताक्रूझ, अंधेरी, बोरीवली, ठाणे, नवी मुंबईतही मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला. मंगळवारी मध्यरात्री पडलेल्या पावसानंतर बुधवारी शहरात रिमझिम पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पावसाने हजेरी लावल्यामुळे तापमानाचा वाढलेला पारा खाली आला आहे. सोमवारी तापमानाचा पारा 35.5 अंश सेल्सिअस एवढा होता. तो मंगळवारपर्यंत कायम राहिला.


हेही वाचा - 

आणखी काही दिवस निघणार मुंबईकरांचा घामटा


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा