Advertisement

३० डिसेंबरच्या सायंकाळपासूनच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, वरळी सी फेस, बँडस्टँड, जुहू चौपाटी या ठिकाणी उसळणारी गर्दी लक्षात घेऊन बंदोबस्त वाढवण्यात येणार आहे. या ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस 'ड्रोन'चा वापर करणार असून पोलिसांच्या मदतीला राज्य राखीव दलाच्या दहा तुकड्या, शीघ्र कृती दलाच्या तीन कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.

३० डिसेंबरच्या सायंकाळपासूनच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
SHARES

सरत्या वर्षाचा निरोप घेऊन नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत ठिकठिकाणी जय्यत तयारी सुरू झाली आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना आयोजीत केलेल्या कार्यक्रमांना कोणतेही गालबोट लागू नये यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामुळे शहरातील महत्वाच्या चौकात, चौपाटीवर, हाॅटेल्सवर आणि धार्मिक स्थळांजवळ पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. 


ड्रोनचा वापर

नववर्ष स्वागतानिमित्त ३० डिसेंबर रोजी सायंकाळपासूनच रस्त्यांवर पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, वरळी सी फेस, बँडस्टँड, जुहू चौपाटी या ठिकाणी उसळणारी गर्दी लक्षात घेऊन बंदोबस्त वाढवण्यात येणार आहे. या ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस 'ड्रोन'चा वापर करणार असून पोलिसांच्या मदतीला राज्य राखीव दलाच्या दहा तुकड्या, शीघ्र कृती दलाच्या तीन कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. किनाऱ्यावरील गस्तीसाठी पोलीस स्पीड बोटीचा वापर करणार आहेत. या ठिकाणी फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली अाहे. 


सीसीटीव्हीतून लक्ष

 शहरातील ७० हून अधिक ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. मुंबई वाहतूक पोलिसांची विविध पथके शहरातील रस्त्यांवर तैनात केली जाणार असून ही पथके मद्यपी वाहनचालकांची तपासणी करतील. नाकाबंदी दरम्यान मद्यपींवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक युनिटकडे दोन ते तीन श्वास विश्लेषक यंत्रे आहेत. त्याचबरोबर पोलिस नियंत्रण केंद्रातून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक महत्वाच्या ठिकाणी पोलिस तिसऱ्या डोळ्याने लक्ष ठेवणार आहेत. 


जागा बदलून मद्य तपासणी 

अनेक जण पार्टीला जाण्यापूर्वी वाहतूक पोलिसांची पथकं कोणत्या मार्गावर तैनात आहेत, याचा अंदाज घेतात आणि पार्टीत मद्य रिचवून घरी परतताना तपासणी मार्ग वगळून अन्य मार्गांनी जातात. अशा चकवा देऊ पाहणाऱ्या मद्यपी चालकांवर कारवाई करण्यासाठी यंदा अर्धा तासाच्या फरकाने पोलिसांची पथके जागा बदलून मद्य तपासणी करणार आहेत.  तसंच हॉटेलमधील ग्राहकांना घरी परतण्यासाठी वाहनचालक किंवा टॅक्सीची व्यवस्था करण्याच्या सूचना हॉटेल मालकांना देण्यात येणार आहेत. 



हेही वाचा - 

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर एफडीएची हाॅटेल, केक, वाईन शाॅपवर करडी नजर




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा