Advertisement

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर एफडीएची हाॅटेल, केक, वाईन शाॅपवर करडी नजर

मुंबईतील ५० हाॅटेल-रेस्टाॅरन्टची तपासणी एफडीएकडून करण्यात आली आहे. या तपासणीत तर मुंबईतील सर्वच्या सर्व २६ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना हाॅटेल-रेस्टाॅरन्ट, केक शाॅप आणि वाईन शाॅपवर करडी नजर ठेवण्याचे आदेशही एफडीएकडून देण्यात आले आहेत.

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर एफडीएची हाॅटेल, केक, वाईन शाॅपवर करडी नजर
SHARES

नववर्षाच्या स्वागतासाठी आता आख्खी मुंबापुरी सज्ज झाली आहे. हाॅटेल, रेस्टाॅरंटमध्ये आतापासूनच पार्ट्यांची तयारी सुरू झाली आहे. त्यातही नववर्षाचं स्वागत म्हटलं की आधी येते ती दारू आणि केक. त्यामुळं केक शाॅप आणि वाईन शाॅपमध्येही ३१ डिसेंबरला मोठी गर्दी असते. पण नववर्षाचं स्वागत करताना सर्वांनीच विशेष काळजी घेणं तितकंच गरजेचं असतं. 

भेसळयुक्त-असुरक्षित अन्नपदार्थ तसंच बनवाट दारू यावेळी विक्रीसाठी येण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे ३१ डिसेंबरला अन्न आणि औषध प्रशासन ( एफडीए) नववर्षाच्यानिमित्ताने हाॅटेल-रेस्टाॅरन्ट, केक शाॅप आणि वाईन शाॅपवर करडी नजर ठेवून असते. त्यानुसार यंदाही एफडीएच्या बृहन्मुंबई विभागाकडून विशेष मोहीम राबवत हाॅटेल-रेस्टाॅरन्ट, केक शाॅप आणि वाईन शाॅपची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती एफडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.


बनावट दारू

गणेशोत्सव, नवरात्र, दसरा-दिवाळीप्रमाणेच ख्रिसमस आणि नववर्षातील अन्नपदार्थांची वाढती मागणी लक्षात घेता भेसळखोर सक्रीय होतात. तर दारूचीही मागणी मोठी वाढत असल्यानं गोवा, गुजरात आणि अन्य भागातून बनावट दारूही मोठ्या प्रमाणात मुंबईत येते. असे भेसळयुक्त अन्नपदार्थ खाणं वा बनावट दारू पिणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळेच एफडीएनं दरवर्षीप्रमाणे विशेष मोहिमेला सुरूवात केली आहे.


२२ केक शाॅपची तपासणी 

आतापर्यंत मुंबईतील ५० हाॅटेल-रेस्टाॅरन्टची तपासणी एफडीएकडून करण्यात आली आहे. या तपासणीत तर मुंबईतील सर्वच्या सर्व २६ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना हाॅटेल-रेस्टाॅरन्ट, केक शाॅप आणि वाईन शाॅपवर करडी नजर ठेवण्याचे आदेशही एफडीएकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार आतापर्यंत २२ केक शाॅपचीही तपासणी एफडीएनं केली आहे. या तपासणीत अद्याप काही आढळलं नसलं तरी ३०-३१ डिसेंबरला अन्नपदार्थ, केक आणि दारूची तपासणी महत्त्वाची ठरणार आहे. त्यानुसार या दोन दिवसांत एफडीएची मोहीम आणखी वेग धरणार असल्याचही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. 


एफडीएचं अावाहन

दारूच्या तपासणीचे सर्व अधिकारी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे असले तरी एफडीएही आपल्या अखत्यारित दारूची तपासणी करत दारूचे नमुने घेते. त्याप्रमाणे आता लवकरच दारूचे नमुने जमा करत ते तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचंही एफडीएतील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तर नववर्षाचं स्वागत जोरात- उत्साहात करा, पण ते करताना सुरक्षित-स्वच्छ अन्नपदार्थांचं सेवन करण्यावर लक्ष द्या, बनावट दारू  टाळा असं आवाहनही एफडीएच्या माध्यमातून नागरिकांना करण्यात आलं आहे.हेही वाचा -


स्टेथोस्कोपच्या जागी हातात फळ आणि वजनकाटा

अमूलच्या नावाखाली बनावट बटरची विक्री; ठाण्यात एफडीएची कारवाई
Read this story in हिंदी
संबंधित विषय