Advertisement

कमला नेहरू पार्कमधून विनाअडथळा 'मुंबई दर्शन', इमारतींच्या उंचीवर मर्यादा


कमला नेहरू पार्कमधून विनाअडथळा 'मुंबई दर्शन', इमारतींच्या उंचीवर मर्यादा
SHARES

मुंबईतील प्रसिद्ध कमला नेहरू पार्कमध्ये जाऊन मुंबईचे सौंदर्य न्याहाळणे हा एकेकाळी मुंबईकरांचा आवडता छंद होता. आजही शाळकरी मुले, मुंबईबाहेरून येणारे पर्यटक आवर्जून या पार्काला भेट देत गिरगाव चौपाटी, क्विन्स नेकलेस, विधानभवनसहित मुंबईचे वैभव डोळ्यात टिपून घेतात. मात्र दक्षिण मुंबईतील जागोजागी उभ्या राहणाऱ्या उत्तुंग इमारतींमुळे पर्यटकांना मुंबईचा नयनरम्य नजारा पाहणे अडचणीचे ठरू लागले आहे. त्यामुळे मलबार हिलसह मरीन ड्राईव्ह परिसरात नव्याने उभ्या राहणाऱ्या उत्तुंग इमारतींचे पंख आता छाटले जाणार आहेत.

या परिसरात यापुढे २१.३५ मीटर पेक्षा जास्त उंचीची एकही इमारत उभी राहणार नाही. याद्वारे कमला नेहरू उद्यानातील 'व्ह्यूईंग गॅलरी'आड येणाऱ्या टोलेजंग इमारतींना लगाम घालण्यात येणार आहे.


'जीआयएस'च्या मदतीने प्रतिकृती

मलबार हिलमधील कमला नेहरु उद्यानातील 'व्ह्यूईंग गॅलरी'मधून बॅकबे, मरीन ड्राईव्ह परिसराच्या पूर्व आणि दक्षिणेकडील दृष्टीक्षेपात येणाऱ्या इमारतींची 'जीआयएस'च्या मदतीने त्रिकोणात्मक प्रतिकृती बनवण्याची निर्देश नगरविकास खात्याने दिले आहेत. त्यानुसार ‘डि’ विभागाच्या विकास नियंत्रण आराखड्यावर दृष्टीक्षेपाचे कोन चिन्हाकिंत करण्यात आले आहे. यामध्ये कोणतीही इमारत २१.३५ मीटर पेक्षा अधिक उंचीची बांधता येणार नाही.



तरच उंचीला परवानगी

या परिसरात कमी उंचीची इमारत बांधताताना त्यात गच्ची, जिने, लिफ्ट तसेच पाणी साठवण्याची टाकी व इमारतीच्या इतर वैशिष्टयाचा समावेश असेल. पण या सोई 'व्ह्यूईंग गॅलरी'च्या आड येणाऱ्या नसतील, तर २१३५ मीटर पेक्षा अधिक उंचीच्या इमारतीला शासनाच्या पूर्व मान्यतेने आयुक्त परवानगी देवू शकतात, असेही महापालिकेच्या विकास नियोजन विभागातील अधिकाऱ्यांकडून समजते.


१०८ भूखंडाचे सर्वेक्षण

या भागातील एकूण १०८ भूखंड व परिसराची पाहणी करून यासाठी रेषेच्या नोंदी घेतल्या जाणार आहे. त्यांचे जीआयएस प्रणालीत विश्लेषण करून डिजिटल एलिव्हेशन मॉडेल तयार करण्यात येईल. ‘डि’ विभगाच्या विकास आराखड्यावर हे डिजिटल एलिव्हेशन मॉडेल विलीन करण्यात येईल, असे महापालिकेच्या विकास नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या जीआयएस प्रणालीअंतर्गत डिजिटल मॉडेल बनवण्यासाठी आयआयटी पवई या संस्थेची नेमणूक करण्यात आली असल्याचेही अधिकाऱ्यांकडून समजते.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा