Advertisement

मुंबई ऑटो युनियनची भाडेवाढीची मागणी, 'इतकी' होऊ शकते भाडेवाढ

मुंबई रिक्षा युनियननं भाडेवाढीची मागणी केली आहे. यावर काय म्हणाले अधिकारी हे जाणून घ्या.

मुंबई ऑटो युनियनची भाडेवाढीची मागणी, 'इतकी' होऊ शकते भाडेवाढ
(File Image)
SHARES

सीएनजीच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. ही वाढ लक्षात घेता मुंबई रिक्षा युनियननं भाडेवाढीची मागणी केली आहे. कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) च्या किमतीत नुकत्याच झालेल्या वाढीनंतर हा रिक्षा युनियननं ही मागणी केली आहे.

मुंबई रिक्षामेन्स युनियनसह अन्य काही संघटनांनी केलेल्या मागणीत इंधन दरवाढ झाल्याने चालकांना एका किलोमीटर मागे १.३१ रुपये अतिरिक्त खर्च येत असल्याचे सांगितले. त्यामुळे खटुआ समितीनुसार किमान दोन ते तीन रुपयांची भाडेवाढीची मागणी केल्याचे रिक्षामेन्स युनियनचे सरचिटणीस तंबी कुरियन यांनी सांगितले.

युनियननं संबंधित अधिकार्‍यांना पत्र लिहलं आहे आणि त्यांच्याशी चर्चा देखील केली आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यासोबतच आम्हाला आश्वासन दिलं आहे की भाडे निश्चित वाढवले जाईल. याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असं मुंबई रिक्षा मेन्स युनियनचे सरचिटणीस एफपीजे यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे, मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे नेते एएल क्वाड्रोस यांनी आधी सांगितलं की, खटुआ समितीच्या अहवालानुसार, इंधन दरात २५ टक्के वाढ झाल्यानंतर, टॅक्सींच्या भाड्यातही वाढ करणं आवश्यक आहे. त्यामुळे किमान ५ रुपयाची भाडेवाढ आवश्यक आहे. सध्या, १.५ किमीसाठी किमान भाडे २५ रुपये आहे.

परिवहन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, त्यांना ऑटो आणि टॅक्सी युनियनची भाडेवाढीची मागणी प्राप्त झाली आहे. या मुद्द्याचा अभ्यास करून अंतिम निर्णय मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरण (MMRTA) घेईल.

दुसरीकडे, ऑटो युनियनचे नेते, शशांक राव यांचं असं मत आहे की, सरकारनं टॅक्सी आणि रिक्षा चालकांना सवलतीच्या दरात सीएनजी द्यायला हवा. भाडेवाढ हा योग्य उपाय नाही कारण त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे.हेही वाचा

पावसाच्या रिमझिमनंतर मुंबईत पुन्हा तापमानात वाढ

खार सबवे 'या' तारखेपर्यंत वाहतूकीसाठी बंद, जाणून घ्या वेळ

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा