Advertisement

खार सबवे 'या' तारखेपर्यंत वाहतूकीसाठी बंद, जाणून घ्या वेळ

यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल पश्चिम रेल्वेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे.

खार सबवे 'या' तारखेपर्यंत वाहतूकीसाठी बंद, जाणून घ्या वेळ
(Representational Image)
SHARES

भुयारी मार्गाच्या तातडीच्या दुरुस्तीच्या कामामुळे, खार गोळीबार भुयारी मार्ग २ मे २०२२ पर्यंत बंद करण्यात आला आहे. रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, खार गोळीबार भुयारी मार्ग वाकोला जंक्शन आणि सांताक्रूझ स्टेशन आणि गोळीबार रोडकडून सांताक्रूझ पश्चिमेकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या मोटार वाहनांसाठी आणि पादचाऱ्यांसाठी २ मे पर्यंत बंद राहील.

त्यानुसार वाकोला जंक्शन, सांताक्रूझ स्टेशन आणि गोळीबार रोडकडून खार सबवेकडे येणारी सर्व प्रकारची वाहनं आग्रीपाडा स्लिप रोडवरून मिलन सबवेकडे वळवण्यात आली आहेत. यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल पश्चिम रेल्वेनं प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे.

सात महिन्यांपूर्वी खार आणि सांताक्रूझमधील रहिवाशांनी खार भुयारी मार्गाच्या जीर्ण अवस्थेकडे अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यास संभाव्य आंदोलनाचे संकेत दिले होते.

नागरिक आणि रहिवासी संघटनेनं असा दावा केला होता की, भुयारी मार्गासाठी पायाभूत सुविधांचा विकास तसंच स्ट्रक्चरल ऑडिट आवश्यक आहे. कारण यामुळे सुरक्षा आणि सुरक्षेला धोका निर्माण होत आहे. कारवाई न झाल्यास न्यायालयात धाव घेऊ, असा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.

इतर घडामोडींमध्ये वांद्रे आणि खार येथील रहिवाशी वाहतूक कोंडीच्या तक्रारी करत आहेत. ही समस्या सोडवण्यासाठी वाहतूक विभागानं सम-विषम पार्किंग व्यवस्था लागू केली होती.



हेही वाचा

रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत लाउडस्पीकर-भोंग्यांवर बंदी, मुंबई पोलिसांचा निर्णय

मुंबईत ७२ टक्के मशिदींवरच्या भोंग्यांचा आवाज कमी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा