Advertisement

रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत लाउडस्पीकर-भोंग्यांवर बंदी, मुंबई पोलिसांचा निर्णय

मुंबई पोलिसांनी लाऊडस्पीकर आणि प्रक्षोभक विधानांशी संबंधित तक्रारींवर आता मोठा निर्णय घेतला आहे.

रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत लाउडस्पीकर-भोंग्यांवर बंदी, मुंबई पोलिसांचा निर्णय
SHARES

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) लाऊडस्पीकर (loudspeaker) आणि त्यासंदर्भातील प्रक्षोभक वक्तव्यांसंबंधीच्या तक्रारींवर आता मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत (Mumbai) रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत लाउडस्पीकर वाजवू नये, असे आदेश मुंबई पोलिसांनी दिले आहेत.

सायलेंट झोनमध्ये कोणालाही लाऊडस्पीकर, भोंगे लावण्याची परवानगी नसेल. याशिवाय रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत संपूर्ण मुंबईत लाऊडस्पीकर किंवा भोंगे वाजवण्याची परवानगी नसले. जर कोणीही लाऊडस्पीकर किंवा भोंगे वाजवले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. याचा अर्थ धार्मिक स्थळ असो किंवा कोणताही खासगी कार्यक्रम असतो, असं केल्यास कारवाई करण्यात येणार.

सर्वोच्च न्यायालयानं ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी दिलेल्या आदेशाची मुंबई पोलिसांकडून आता सक्त अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक टीम ही तयार केली आहे. कंट्रोल रूमला जर कॉल आला तर कायदेशीर कारवाई केली जाईल.

हे नियम लागू

  • अनेक मशिदी आणि मंदिरे कायदेशीररित्या बांधली गेली आहेत, परंतु जी बेकायदेशीर आहेत किंवा सर्व नियमांचे पालन न करता बांधलेली आहेत, त्यांना लाऊडस्पीकरची परवानगी दिली जाणार नाही.
  • मंदिर आणि मशिदींमध्ये लाऊडस्पीकरला परवानगी देताना, मुंबई पोलीस रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत ध्वनिप्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोर पालन होत असल्याचं सुनिश्चित करणार आहे.
  • ज्या धार्मिक संस्था सायलेंट झोनमध्ये नाहीत, त्यांनाच लाऊडस्पीकरची परवानगी असेल. यासोबतच लाऊडस्पीकरची परवानगी घेणारी मशीद किंवा मंदिराची रचना कायदेशीर आहे की, नाही हेही पाहिलं जाणार आहे.



हेही वाचा

मुंबईत ७२ टक्के मशिदींवरच्या भोंग्यांचा आवाज कमी

राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला 'या' पक्षांचा विरोध

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा