Coronavirus cases in Maharashtra: 192Mumbai: 56Islampur Sangli: 24Pune: 18Pimpri Chinchwad: 13Nagpur: 10Kalyan: 6Navi Mumbai: 6Thane: 5Yawatmal: 4Ahmednagar: 3Satara: 2Panvel: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Vasai-Virar: 1Sindudurga: 1Kolhapur: 1Pune Gramin: 1Godiya: 1Palghar: 1Gujrath Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 5Total Discharged: 28BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

महापालिकेची 'बेस्ट' आयडिया, बस थांब्यावर व्हर्टिकल गार्डन

महापालिकेनं बस थांब्यावर व्हर्टिकल गार्डन उभारलं आहे. बस थांब्यावर फुलवलेल्या या बगीच्याची पहिली झलक पाहा... कशी वाटली पालिकेची आयडियाची कल्पना...

महापालिकेची 'बेस्ट' आयडिया, बस थांब्यावर व्हर्टिकल गार्डन
SHARE

शिवाजी पार्क-दादर परिसरात सौंदर्यीकरणासाठी अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. या मार्गावर पदपथाचे रुंदीकरण आणि सुशोभीकरण करण्यात येत आहे. बस थांब्यांमागे झाडांच्या कुंड्यांचा वापर करून व्हर्टिकल गार्डन साकारलं जात आहे. याच उपक्रमा अंतर्गत शिवाजी पार्क बसस्टॉपवर छोटा आणि सुंदर असा बगीचा फुलवण्यात आला आहे. या व्हर्टिकल गार्डनचे फोटो मुंबई लाइव्ह आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत

फक्त एकाच बस स्टॉपवर नाही तर शिवाजी पार्क परिसरातील जुन्या महापौर बंगल्यापासून व्हर्टिकल गार्डन प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. या परिसरात आणखी ८ बस थांब्यांवर व्हर्टिकल गार्डनं उभारली जाणार आहे. महानगरपालिकेनं शिवाजी पार्क जवळ व्हर्टिकल गार्डनची उभारणी करण्यासाठी ५.६९ कोटी रुपये खर्च केले आहेत. हे पायलट प्रोजेक्ट असून जूनपर्यंत पूर्ण करण्याचा महापालिकेचा मानस आहे.  

माहीम कॉजवे ते सिद्धीविनायक मंदिर हा साडेचार किलोमीटर रस्ता मुंबईतील सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. सिद्धीविनायक मंदिर, चैत्यभूमी, बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळ या ठिकाणांवर पर्यटकांसोबतच इतर मुंबईकरांची देखील वर्दळ असते. असं असलं तरी या महत्त्वाच्या ठिकाणांवर आवश्यक सोई-सुविधा नाहीत. त्यामुळे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील महत्त्वाच्या मार्गावर सर्व सोई-सुविधा देण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत

उल्लेखनीय म्हणजे चीनमधील नानजिंग ग्रीन टावर्स हे आशियातील पहिलं व्हर्टिकल गार्डन आहे. ६५६ फूट आणि ३५४ फूट उंच इमारतींमध्ये ३००० रोपं, २५०० वेगवेगळ्या प्रजातीची झुडपं लावण्यात आली आहेत. ६०० फुट उंच झाडे आणि ५०० मध्यम आकाराची झाडं ६००० चौरस किलोमीटर क्षेत्रात लावली आहेत.
संबंधित विषय
ताज्या बातम्या