Advertisement

मरिन ड्राईव्हचा हेरिटेज विकास!

दक्षिण मुंबईच्या सौंदर्यीकरणात भर

मरिन ड्राईव्हचा हेरिटेज विकास!
SHARES

आता मरीन ड्राईव्ह आणि फ्लोरा फाऊंटन, एशियाटिक लायब्ररी परिसराचा हेरिटेज विकास करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या परिसराचा विकास कशा पद्धतीने करायचा, याची संकल्पना तयार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्था व प्रकल्प सल्लागार नेमणुकीसाठी स्वारस्य अभिरूची प्रस्ताव मागवले आहेत.

मुंबईचे सौंदर्यीकरणाचे काम पालिकेने हाती घेतले असून आतापर्यंत 965 कामे पूर्ण झाली आहेत. मरिन ड्राईव्ह परिसरातील नागरी सुविधा, स्वच्छता आणि सुशोभीकरण कामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मे महिन्यात पाहणी दौरा केला होता.

तर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी पालिका आयुक्तांची भेट घेत नरिमन पॉइंट, मरिन ड्राईव्ह आदी परिसरात पर्यटकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करा आणि परिसराचे सौंदर्यीकरण करा, अशा सूचना केल्या होत्या.

मरिन ड्राईव्ह परिसरातील समुद्राच्या दिशेने उभ्या असलेल्या इमारतींना विशिष्ट रंगरंगोटी देण्यात यावी. तसेच प्रसाधनगृहे, स्वच्छता आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा लेझर शो याठिकाणी सुरू करावा, असे स्पष्ट करत सध्या सुरू असलेल्या सुशोभीकरण कामांच्या आणि स्वच्छतेच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी विविध सूचना केल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर पालिका मुख्यालयात काही दिवसांपूर्वी एक बैठक आयोजित करण्यात आली होती.

आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मरिन ड्राईव्ह परिसरात समुद्राच्या दिशेने आसनव्यवस्था, खासगी कंपन्यांच्या सामाजिक दायित्व सहभागाने प्रसाधनगृह सुविधा येत्या काही दिवसात करण्यात येईल. पर्यटकांना समुद्र पाहण्यासाठी चांगली, सुखकर जागा मिळेल. त्यादृष्टीने कामाला सुरुवात करण्यात येत आहे, असे आयुक्तांनी नमूद केले.

दरम्यान येत्या काळात मरीन ड्राईव्ह आणि फ्लोरा फाऊंटन ते एशियाटिक लायब्ररी परिसराचा पालिकेच्या हेरिटेज विभागामार्फत विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे दोन्ही हेरिटेज परिसर असल्याने येथील रस्ते, सार्वजनिक खुल्या जागा आणि मरिन ड्राईव्ह परिसराचे (प्रोमेनेड) पुनरूज्जीवन करण्यात येणार आहे. 



हेही वाचा

अनंत चतुर्दशी आणि ईद एकाच दिवशी, नवी मुंबईतील मुस्लिम बांधवांचा मोठा निर्णय

मुंबईतील ही 'सहा' नामांकित हॉटेल्स राहणार बंद

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा