Advertisement

सिद्धिविनायक मंदिरात नोकरभरतीत घोटाळा, हिंदू जनजागृती समितीचा आरोप


सिद्धिविनायक मंदिरात नोकरभरतीत घोटाळा,  हिंदू जनजागृती समितीचा आरोप
SHARES

सिद्धिविनायक मंदिरात शासनाने ठरवून दिलेल्या कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त कर्मचारी भरती केले असून ट्रस्टला मिळालेल्या दानातूनच अतिरिक्त कर्मचाऱ्यांना पगार दिला जात असल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीने शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.

 सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या माजी विश्‍वस्तांनी भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या धनाचा अपहार केल्याप्रकरणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी विधी आणि न्याय विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून विधी आणि न्याय विभागाने या प्रकरणाची विस्तृत चौकशी करण्यासाठी सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असा आदेश दिला आहे.


काय आहे आरोप ?

सध्या देवस्थानमध्ये २१३ कर्मचारी कार्यरत आहेत. आकृतीबंधानुसार २० पुजारी नेमण्याला अनुमती आहे.  मात्र सध्या पुजाऱ्यांची संख्या ३१ आहे. तर पहारेकऱ्यांची मर्यादा २७ असताना  ६२ पहारेकरी आहेत.  याशिवाय १५ कामगार ठेवण्याची मान्यता असताना ६६ कामगार ठेवण्यात अाले अाहेत. तर महिला कर्मचाऱ्यांची ३ पदे मंजूर असताना ८ महिला कर्मचारी कार्यरत आहेत. याशिवाय २० स्वच्छता कर्मचाऱ्यांना अनुमती असताना २७ स्वच्छता कर्मचारी कार्यरत आहेत. तसंच वायरमनमची ३ पदं भरण्यास मंजुरी असताना ६ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. देवस्थानने शासनाची अनुमती न घेता परस्पर ११२ अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

नोटाबंदीत नोटा बदलल्या

नोटाबंदीच्या काळात मंदिरातून नोटा बदलून घेतल्या, महिला भक्तांना हाताने खेचत त्यांना अपशब्द वापरण्यात आले, देणगीदारांना मूर्त्या परस्पर खरेदी करून देण्यात आल्या, वाहन भत्ता मिळत असतानाही शासकीय वाहन वापरण्यात आले, देणगीदारांकडून परस्पर १० लाख रुपये घेतले गेले आणि ते मंदिरात जमा करण्यात आले नाहीत, असेही अारोप हिंदू जनजागृती समितीने  केले अाहेत.



शासनाने आकृतीबंधान्वये आखून दिलेल्या कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून त्यांच्या वेतनावर भाविकांनी अर्पण केलेल्या निधीतून लाखो रुपये खर्च करून लूट केली जात अाहे. कार्यकारी अधिकारी संजीव पाटील यांच्याविरोधात गंभीर तक्रार असूनही शासनाने त्यांच्यावर काहीच कारवाई केलेली नाही. ताब्यातील मंदिरे सांभाळता न येणारे शासन कोणत्या तोंडाने नवीन मंदिरे ताब्यात घेत आहे.
 - वीरेंद्र इचलकरंजीकर,  हिंदु विधीज्ञ परिषद



हेही वाचा -

रेल्वे अपघातग्रस्त तेजश्रीला हवाय मदतीचा हात!

बॅण्डस्टॅण्ड समुद्रकिनारी आढळला मृत डॉल्फिन



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा