Advertisement

बॅण्डस्टॅण्ड समुद्रकिनारी आढळला मृत डॉल्फिन


बॅण्डस्टॅण्ड समुद्रकिनारी आढळला मृत डॉल्फिन
SHARES

मुंबईतल्या वांद्रे येथील चिंबई समुद्रकिनारी बुधवारी मृत डॉल्फिन मासा आढळला होता. त्यानंतर आणखी एक मृत डॉल्फिन वांद्रे पश्चिम येथील बॅण्डस्टॅण्ड समुद्रकिनारी गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास आढळला. हा डॉल्फिन ६ फूट ३ इंच लांबीचा असून त्याच्या मृत्यूचं कारण अद्याप समजलेलं नाही. मृत डॉल्फिन परळ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात अाला अाहे.


अहवाल काही दिवसात

डॉल्फिनचे शवविच्छेदन झाले असून त्याचा अहवाल काही दिवसात येणार आहे. शवविच्छेदनानंतर या डॉल्फिनला बोरीवलीतील नॅशनल पार्क येथे नेण्यात आलं.  इथं त्याची कातडी काढली जाणार आहे. तसंच कातडी काढून झाल्यावर त्याच्यावर वैद्यकीय प्रक्रिया करून तिथंच ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर, एेरोली इथं होणाऱ्या सागरी जीव संग्रहालयात या  डॉल्फिनचा सापळा ठेवला जाणार आहे, असं मुंबई लाइव्हशी बोलताना पश्चिम मुंबईचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत देशमुख यांनी सांगितलं.


३ डॉल्फिनचा मृत्यू

 चिंबई समुद्र किनारी आढळलेला मृत डॉल्फिन ६ फुटांचा होता. याआधी देखील ३ मृत डॉल्फिन आढळले होते. या डॉल्फिनचे देखील शवविच्छेदन करण्यात आलं होतं. या तीन डॉल्फिनच्या शवविच्छेदनच्या अहवालात श्वासोच्छ्वास घेण्याची समस्या असल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं.



हेही वाचा - 

काॅलेजांचा मागासवर्गीय कोटा रद्द, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

काॅलेजांत भगवद्गीता वाटण्याचा निर्णय मागे?




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा