Advertisement

काॅलेजांत भगवद्गीता वाटण्याचा निर्णय मागे?

विद्यार्थी संघटना आणि राजकीय पातळीवरील प्रचंड विरोधानंतर काॅलेजांमध्ये भगवद्गीता वाटपाचं परिपत्रक रद्द करण्याचा विचार शिक्षण संचालककडून होत आहे.

काॅलेजांत भगवद्गीता वाटण्याचा निर्णय मागे?
SHARES

मुंबई विभागीय शिक्षण सहसंचालकांनी शहरातील कॉलेजांमध्ये भगवद्गीतेचं वाटप करण्यासंदर्भात जारी केलेल्या परिपत्रकावरून गुरुवारी राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. या परिपत्रकाला विद्यार्थी संघटनांसह, विरोधी पक्षानंही कडाडून विरोध केला होता. या विरोधानंतर हे परिपत्रक रद्द करण्याचा विचार शिक्षण संचालककडून होत आहे.


काय होती सूचना?

बुधवारी ११ जुलैला सहसंचालकांनी शहरातील सर्व अशासकीय अनुदानित कॉलेजांना भगवद्गीतंचं संच घेण्याबाबत सूचना केली होती. विद्यार्थ्यांनी भगवद्गीतेचे वाचन करावं, या उद्देशानं नॅकच्या अ आणि अ+ श्रेणी प्राप्त १०० कॉलेजांमध्ये भगवद्गीता संचाचं वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याशिवाय संबंधित कॉलेजांनी हे संच घेऊन जावेत, असे आदेशही उच्च शिक्षण मुंबईच्या सहसंचालकांनी दिले होते.

यानंतर शिक्षण क्षेत्रात एका वेगळ्याच चर्चेला उधाण आलं. भगवद्गीतेचे धडे देऊन शिक्षण संचालकांना काय सिद्ध करायचं आहे? असा प्रश्नही विरोधकांनी सत्ताधारी पक्षांना विचारला जात आहे.


आझमी यांची टीका

या परीपत्रकानंतर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू आझमी यांनी भाजपा सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. २०१९ च्या निवडणुकीसाठी धर्माच्या नावाखाली मत विभाजन करण्याचा भाजपाचा डाव आहे. तसंच भगवद्गीता वाटपापेक्षा कुराण बायबलचंही वाटप करा, असंही अबू आझमी यांनी सांगितलं.


तावडे यांचा खुलासा

या सर्व प्रकरणानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी भगवद्गीतेचं वाटप भक्ती वेदांत बुक ट्रस्ट, भिवंडी यांच्या मार्फत करण्यात येत असून यामध्ये शासनाचा कोणताही संबंध नाही असा खुलासा केला होता. तसंच कुणी कुराण, बायबलचं वाटप करण्याची विनंती केली, तर त्यासाठीही परवानगी देण्यात येईल, असंही शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं होतं.



हेही वाचा-

...तर काॅलेजमध्ये कुराण, बायबलही वाटू - शिक्षणमंत्री

आता काॅलेजांमध्ये वाटणार भगवद्गीता!



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा