Advertisement

रेल्वे अपघातग्रस्त तेजश्रीला हवाय मदतीचा हात!

तेजश्रीच्या उपचारांवर महिन्याकाठी मोठा खर्च होत असून रेल्वेकडून तिच्या कुटुंबीयांना अद्याप कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत मिळालेली नाही. परिणामी तिच्या उपचारांमध्ये आर्थिक अडचणी येत अाहेत.

रेल्वे अपघातग्रस्त तेजश्रीला हवाय मदतीचा हात!
SHARES

तीन महिन्यांपूर्वी लोकलमधून पडून गंभीर जखमी झालेली २३ वर्षांची तेजश्री वैद्य ही तरूणी अजूनही कोमातून पूर्णपणे बाहेर येऊ शकलेली नाही. तेजश्रीच्या उपचारांवर महिन्याकाठी मोठा खर्च होत असून रेल्वेकडून तिच्या कुटुंबीयांना अद्याप कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत मिळालेली नाही. परिणामी तिच्या उपचारांमध्ये आर्थिक अडचणी येत अाहेत. तेजश्रीवर लवकरच विशेष थेरपी करायची असून त्यासाठी येणारा खर्च रेल्वेकडून मिळावा, अशी मागणी तिच्या कुटुंबीयांनी रेल्वे प्राधिकरणाकडे केली आहे.


सध्या प्रकृती कशी?

तेजश्रीवर सध्या सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत झालेल्या उपचारांना तिच्या शरीराकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. पूर्णपणे कोमातून बाहेर न आलेली तेजश्री मोठ्या प्रयत्नाने डावा डोळा उघडू शकते आणि डावा पाय हलवू शकते. त्या व्यतीरिक्त तिच्या शरीराच्या संवेदना तिला जाणवत नाहीत.


कुठल्या उपचारांची गरज?

तेजश्रीच्या शरीराने उपचारांना प्रतिसाद द्यावा म्हणून डाॅक्टरांनी तिच्यासाठी विशेष थेरपी सुचवली आहे. या थेरपीत एका विशिष्ट प्रकारच्या मशिनमध्ये तिला ठेवण्यात येतं. या मशिनद्वारे तिच्या शरीराला आॅक्सिजनचा अतिरिक्त पुरवठा होऊन तिचं शरीर हळूहळू उपचारांना प्रतिसाद देऊ लागेल, असं डाॅक्टरांचं म्हणणं आहे.

या उपचारांचा खर्च दिवसाला १४ हजार रुपयांचा आहे. शिवाय या थेरपीची सोय सायन रुग्णालयात नसल्याने तिला रहेजा रुग्णालयात दाखल करावं लागणार आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी रेल्वेकडे आर्थिक मदत मागितली आहे.


कसा झाला होता अपघात?

विक्रोळीत राहणारी तेजश्री एल्फिन्स्टन रोड इथं कामाला होती. ती विलेपार्लेच्या साठे काॅलेजात एमए पीजी-२ चं शिक्षण घेत होती. परीक्षा सुरू असल्यानं ती केसी काॅलेजमध्ये परीक्षेसाठी निघाली होती. मात्र, माटुंगा आणि शीव रेल्वेस्थानकांदरम्यान ती तीन महिन्यांपूर्वी धावत्या लोकलमधून खाली पडली. या अपघाताबाबत माहिती मिळताचं रेल्वे पोलिस घटनास्थळी धाव घेत रेल्वे रुळाला लागून असलेल्या नाल्यात पडलेल्या तेजश्रीला उचलून रुग्णालयात दाखल केलं हाेतं.



हेही वाचा-

लोकलमधून पडलेल्या तेजश्रीची परिस्थिती नाजूक

कल्याणमध्ये खड्ड्याचा आणखी एक बळी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा