लोकलमधून पडलेल्या तेजश्रीची परिस्थिती नाजूक

तेजश्री वैद्यवर उपचार सुरू असून अजूनही ती बेशुद्ध अवस्थेत आहे. अद्याप तरी सर्जरीची गरज नसल्याचं शीव रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. जयश्री मोंडकर यांनी सांगितलं.

लोकलमधून पडलेल्या तेजश्रीची परिस्थिती नाजूक
SHARES

चालत्या लोकलमधून गुरूवारी खाली पडलेल्या तेजश्री वैद्यची परिस्थिती अजूनही नाजूक असल्याचं कळत आहे.

तेजश्रीवर सध्या शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण, अजूनही तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नसल्याचं सायन रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं.

तेजश्री वैद्यवर उपचार सुरू असून अजूनही ती बेशुद्ध अवस्थेत आहे. अद्याप तरी सर्जरीची गरज नसल्याचं शीव रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. जयश्री मोंडकर यांनी सांगितलं.

नेमकं काय घडलं?

गुरुवारी सायन-माटुंगा रेल्वे स्थानकांदरम्यान पोल क्रमांक १२/३ जवळील नाल्यात तेजश्री चालत्या लोकलमधून पडली. या घटनेत ती जबर जखमी झाली. सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. पत्रकारीता विषयाच्या पदव्युत्तर परीक्षेसाठी तेजश्री सकाळी निघाली होती.

रेल्वे पोलिसांतच्या म्हणण्यानुसार, घटना घडल्याची सूचना साडेनऊ वाजता मिळाल्यानंतर घटनास्थळी जाऊन तिला तत्काळ मदत करण्यात आली. तोपर्यंत तेजश्री नाल्यात पडून होती.

हेही वाचा-

लोकलचा प्रवास जिवावर बेतला; एकीचा मृत्यू, तर दुसरी गंभीर जखमी

गोवंडीत नाल्यात पडून दोघांचा मृत्यू

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा