Advertisement

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अमृतांजन पूल पाडण्यात येणार

दख्खन आणि कोकण यांना जोडणाऱ्या बोर घाटाच्या १८३० च्या बांधकामातील अमृतांजन पूल पाडण्यात येणार आहे

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अमृतांजन पूल पाडण्यात येणार
SHARES

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अमृतांजन पूल पाडण्यात येणार आहे. दख्खन आणि कोकण यांना जोडणाऱ्या बोर घाटाच्या १८३० च्या बांधकामातील अमृतांजन पूल पाडण्यात येणार आहे. या पुलाच्या पाडकामावेळी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक १० किमी अंतरासाठी पर्यायी मार्गानं वळविण्यात येणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूकीस अमृतांजन पूलाचा अडथळा होत असल्यामुळे पाडण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने काही महिन्यांपूर्वी घेतला. 

अमृतांजन पूल पाडण्याचं नियोजन सुरु होतं, मात्र महामार्गावरील वाहनांच्या सततच्या प्रचंड संख्येमुळं ते शक्य झालं नव्हतं.  लॉकडाऊनमुळं महामार्गावरील वाहनांची संख्या कमी झाली असल्यानं ४ एप्रिल ते १४ एप्रिल या काळात नियंत्रित स्फोटकांचा वापर करुन हा पूल पाडण्यात येणार आहे. दरम्यान या काळात द्रुतगती मार्गावरील वाहतूक जुन्या महामार्गावरुन वळविण्यात येणार असल्याचं महामार्ग पोलीसांनी जाहीर केले आहे.

या पुलाखाली अवजड वाहने अडकून होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीतून आता सुटका होणार आहे. या मार्गावर अपघात होण्याचे प्रमाण पूल तोडल्यानंतर शून्यावर येण्याची शक्यता आहे. या पाडकामामुळं मुंबई ते पुणे मार्गावरील वाहतूक अंडा पॉईन्ट येथून जुन्या महामार्गावरुन खंडाळा-लोणावळा शहरातून लोणावळ एक्झिटपर्यंत होईल, तर पुणे-मुंबई मार्गावरील वाहतूक लोणावळा एक्झिट येथून जुन्या महामार्गावरुन लोणावळ-खंडाळामार्गे अंडा पॉईन्टपर्यंत वळविण्यात येणार आहे.

मेजर जनरल सर जॉन माल्कम यांच्या कारकीर्दीत कॅप्टन ह्य़ुजेस यांनी या घाटाचं बांधकाम केलं असून, १० नोव्हेंबर १८३० साली हा घाट खुला करण्यात आला. दख्खन आणि कोकण यामध्ये मालाची वाहतूक करण्यासाठी व्हील्ड कॅरेजचा वापर करण्यासाठी बांधलेला रस्ता, अशा आशयाचा मजकूर या लादीवर कोरण्यात आला आहे.



हेही वाचा -

Coronavirus Updates: धारावीत विलगीकरण अशक्य

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन पेट परीक्षेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा