वसई (vasai) पाठोपाठ नालासोपारा (nala sopara) मतदारसंघात ही शनिवारी वयोवृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांनी (senior citizen) घरातून (home voting) मतदान केले. 130 अर्जदारापैकी 121 नागरिकांनी उस्फुर्तपणे मतदान करीत आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 85 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांना तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या सुविधेचा लाभ घेण्याकरीता संबंधित मतदारांना आवश्यक असलेल्या 12 डी नमुन्याचे वाटप केले होते. त्यापैकी 130 मतदारांनी 132 निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर केले होते.
शनिवारी या मतदारसंघात या मतदानांची प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेसाठी 13 पथके तयार करण्यात आली होती. त्यांच्याद्वारे मतदारांच्या घरी मतपेटी घेऊन जाऊन मतदान घेण्यात आले.
गृह मतदानासाठी नोंदणी झालेल्या 130 मतदारांपैकी 121 नागरिकांनी गृह मतदानाचा हक्क बजावला असे निवडणूक निर्णय अधिकारी शेखर घाडगे यांनी सांगितले आहे. यापूर्वी ज्येष्ठ नागरिक आणि अपंग मतदारांना मतदान करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.
मात्र. यावेळी गृह मतदान पद्धतीमुळे ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांना मतदान करणं सोपं झालं आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढण्यास मोठी मदत होणार आहे. तर आदल्या दिवशी 133 वसई मतदारसंघात ही गृहमतदान घेण्यात आले होते. तेव्हा 374 नागरिकांपैकी 360 नागरिकांनी गृहमतदानाचा हक्क बजावला होता.
हेही वाचा