Advertisement

19-20 नोव्हेंबरला निवडणुकीसाठी स्कूल बसेस बंद

मुंबई आणि जवळपासच्या भागात निवडणुकीशी संबंधित कर्तव्यांसाठी स्कूल आणि टूरिस्ट बसेसची आवश्यकता असलेले निर्देश जारी केल्यानंतर ही घोषणा केली.

19-20 नोव्हेंबरला निवडणुकीसाठी स्कूल बसेस बंद
SHARES

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (maharashtra vidhan sabha election 2024) पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील (maharashtra) तसेच मुंबईतील (mumbai) स्कूल बससेवा (school bus) 19 आणि 20 नोव्हेंबरला बंद ठेवण्यात येणार आहेत.

स्कूल बस ओनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (SBOA) आणि  प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) मुंबई आणि जवळपासच्या भागात निवडणुकीशी (maharashtra election 2024) संबंधित कामांसाठी स्कूल आणि टूरिस्ट बसेसची आवश्यकता असलेले निर्देश जारी केल्यानंतर ही घोषणा केली.

स्कूल आणि टुरिस्टसाठी वापरल्या जाणाऱ्या बसेस निवडणुकीत प्रवासासाठी वापरल्या जाव्यात, असे आदेश आरटीओने दिले आहेत. मतदान सुरळीत पार पाडावे यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत. 

तसेच शाळांचा मतदान केंद्र म्हणूनही वापर केला जाणार आहे. सध्या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. तसेच यातील अनेक शिक्षकांना मतदान केंद्र व्यवस्थापित करण्यासाठी नियुक्त केले आहे.

जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले की, कोणतीही संस्था अथवा कंपनी या नियमाचे पालन करण्यात अयशस्वी झाल्यास त्याला निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार जबाबदार धरले जाईल. कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार, पूर्ण दिवस नाही तरी निदान मतदानासाठी किमान चार तासांची सुट्टी देण्यात यावी.

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक (maharashtra vidhan sabha election) 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.



हेही वाचा

लोकल ट्रेन्सला उशीर का होतो? मोटरमन्सनी सांगितले कारण

विलेपार्ले मतदारसंघात विकासाचा अभाव

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा