Advertisement

लोकल ट्रेन्सला उशीर का होतो? मोटरमन्सनी सांगितले कारण

सध्या कार्यरत कर्मचारी जास्त काम करत आहेत असे असूनही शेकडो पदे अद्याप रिक्त आहेत. तसेच गरज पडल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

लोकल ट्रेन्सला उशीर का होतो? मोटरमन्सनी सांगितले कारण
SHARES

कल्याण (kalyan) स्थानकावरील उपनगरीय लोकलमधील मोटरमन (loco pilot) आणि इतर ट्रेन क्रू बदलल्याने मुख्य मार्गावरील सेवा काही मिनिटे उशीर होत असल्याचा दावा मध्य रेल्वेने (CR) केला. यावरून मध्य रेल्वेने गेल्या आठवड्यात सराव थांबविण्याचे आदेश दिले.

परंतु या निर्णयामुळे रेल्वे कर्मचारी संघटना आणि मोटरमन नाराज झाले आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, वरिष्ठ अधिकारी विलंबासाठी त्यांना दोष देण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या कार्यरत कर्मचारी जास्त काम करत आहेत असे असूनही शेकडो पदे अद्याप रिक्त आहेत. तसेच गरज पडल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

नेहमीप्रमाणे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते कसारा/कर्जत/खोपोली मार्गावर सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी सकाळी 8 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते रात्री 9  या दरम्यान लोको पायलटची बदली कल्याण येथे केली जाते. 

तसेच रोजच्या कामाच्या वेळापत्रकात बदल सूचित केले जातात. परंतु 6 नोव्हेंबरच्या आदेशानुसार, कल्याण येथे क्रु बदलणाऱ्या अनुक्रमे 71 उत्तरेकडे आणि 75 दक्षिणेकडे जाणाऱ्या लोकल आहेत.

“क्रू बदलण्यामुळे कल्याण प्लॅटफॉर्मवर गाड्यांचा खोळंबा होत आहे आणि त्यानंतर येणाऱ्या गाड्यांना विलंब होत आहेत,” त्यामुळे मोटरमनना एका आठवड्याच्या आत किंवा 13 नोव्हेंबरपर्यंत माहिती सुधारण्याचे आवाहन केले आहे.

एका मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, गर्दीच्या वेळेत लोकल साधारणपणे 5-10 मिनिटे उशीराने येतात. “मोटरमनमध्ये बदल झाला असेल, तर दुसऱ्या मोटरमनला  प्लॅटफॉर्मवरून गर्दीतून चालावे लागते, ज्यामुळे मोटरमनला पोहोचण्यास उशीर होतो. आणि सेवांना आणखी 5-7 मिनिटे उशीर होतो. आम्ही ही बाब सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत,” असेही अधिकारी म्हणाले. 

कल्याण येथे क्रू बदलणाऱ्या उपनगरीय लोकलची संख्या यापूर्वी 200 पेक्षा जास्त होती. परंतु विलंब रोखण्यासाठी ही संख्या कमी करण्यात आली होती. तसेच क्रू चेंज न करण्याच्या हालचालीमुळे तणावपूर्ण परिस्थितीत 6-7 तास काम करणाऱ्या मोटरमनच्या कामाच्या तासांमध्ये दररोज 20-30 मिनिटांची भर पडते, असेही अधिकाऱ्याने सांगितले.

एक मोटरमन म्हणाले, “प्रशासन क्षमतेपेक्षा आणि शक्यतेपेक्षा जास्त गाड्या चालवताना विलंबासाठी मोटरमनना जबाबदार धरत आहे हे चुकीचे आहे. यंत्रणेत बिघाड आणि त्रुटी जवळजवळ रोजच घडतात.” 

तसेच ते पुढे म्हणाले की, दररोज सुमारे 750 मोटरमन 1,810 लोकल चालवतात, तर मोटरमनची जवळपास 300 पदे रिक्त आहेत. ज्यामुळे मोटरमनवर ताण पडतो.

मध्य रेल्वे मजदूर संघाने या कारवाईवर आधीच चिंता व्यक्त केली आहे. सीएसएमटी येथील मोटरमनच्या रनिंग रूमच्या बाहेर एका नोटीसमध्ये, युनियनने मध्य रेल्वेच्या (central railway) अधिकाऱ्यांना माहितीत बदल केल्याबद्दल दोषी ठरवले आहे आणि गरज पडल्यास कामगार आंदोलन सुरू करतील असा इशारा दिला आहे.



हेही वाचा

मुंबईत प्रथम नमो भारत रॅपिड रेल्वेची ट्रायल रन

मुंबईत मधुमेह आणि श्वसनाचे आजारात वाढ

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा