Advertisement

मुंबईत प्रथम नमो भारत रॅपिड रेल्वेची ट्रायल रन

नमो भारतचा टॉप स्पीड 130 किमी प्रतितास आहे. जो मध्यम अंतराच्या प्रवासासाठी उत्तम आहे.

मुंबईत प्रथम नमो भारत रॅपिड रेल्वेची ट्रायल रन
(Image: X)
SHARES

नमो भारत रॅपिड रेल्वेने सोमवार, 4 नोव्हेंबर रोजी मुंबईत (mumbai) आपली पहिली चाचणी (trial run) पूर्ण केली. चाचणी दरम्यान ट्रेनने 130 किमी प्रतितास वेग गाठला. मुंबईत नमो भारतची (Namo Bharat Rapid Rail) ही पहिलीच चाचणी होती. अहमदाबादहून सुटलेली ट्रेन सोमवारी पहाटे मुंबईत आली.

वंदे भारतच्या अनुषंगाने तयार केलेली नमो भारत ट्रेन प्रवासासाठी अधिक आरामदायी पर्याय म्हणून तयार करण्यात आली आहे. 250 ते 350 किलोमीटर दरम्यानच्या इंटरसिटी मार्गांसाठी सरासरी तीन ते पाच तासांचा प्रवास अवधी आहे.

नमो भारतचा टॉप स्पीड 130 किमी प्रतितास आहे. जो मध्यम अंतराच्या प्रवासासाठी उत्तम आहे. ही ट्रेन पूर्वी वंदे मेट्रो म्हणून ओळखली जात होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि सुरत दरम्यान तात्पुरता मार्ग सुरू करण्याबाबत चर्चा सुरू आहे. सध्या, नमो भारत अहमदाबाद आणि भुजपर्यंत 110 किमी प्रतितास या वेगाने 360 किलोमीटर अंतर व्यापते. या मार्गाला अंदाजे 5 तास 45 मिनिटे लागतात.

प्रवाशांना नमो भारतमध्ये विविध प्रकारच्या आधुनिक सुविधांचा लाभ घेता येणार आहे. वातानुकूलित डबे, पॅडेड सीट्स, माहितीसाठी स्क्रीन, आधुनिक स्वच्छतागृहे, सीसीटीव्ही, टॉक-बॅक सिस्टम, फायर डिटेक्शन आणि प्रगत व्हॅक्यूम टॉयलेट या सर्व सुविधांनी परिपूर्ण असणार आहे.


हेही वाचा

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी 80 कोटी रुपयांची तरतूद

मेट्रो स्टेशनवरून राजकीय वादाला तोंड फुटले

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा