Advertisement

ठाण्यातील हॉटेल, बार, रेस्टॉरंट, चित्रपटगृहांना रात्री साडे अकरापर्यंतच परवानगी

साडे अकरानंतर हॉटेल खुले दिसले तर सील करण्यात येईल असा इशाराच पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिला आहे.

ठाण्यातील हॉटेल, बार, रेस्टॉरंट, चित्रपटगृहांना रात्री साडे अकरापर्यंतच परवानगी
SHARES

ठाण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आता महापालिका घेण्यासाठी पालिकेची वाटचाल सुरू आहेत. ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या हॉटेल,बार,रेस्टॉरंट आणि चित्रपटगृहांना रात्री साडे अकरापर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. साडे अकरानंतर हॉटेल खुले दिसले तर सील करण्यात येईल असा इशाराच पालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी दिला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात मागील काही दिवसांपासून रोज २५० ते ३०० नवे कोरोना रुग्ण आढळून येत आहे. बुधवारी तर पाचशेपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर  बुधवारी ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात नरेंद्र बल्लाळ सभागृहात हॉटेल चालक आणि चित्रपटगृहाचे मालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महापौर नरेश म्हस्के पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा आणि सहाय्यक आयुक्त उपस्थित होते. 

नियमाचे उल्लंघन करण्यात आल्यास सिनेमागृह, हॉटेल, रेस्टॉरंट पूर्णतः बंद करण्यात येईल. तसंच आपत्ती व्यवस्थापन अधिनियमान्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी या बैठकीत दिला.

ठाण्यातील सिनेमागृह, हॉटेल,रेस्टॉरंटमध्ये एकूण क्षमतेच्या ५० टक्केच परवानगी देण्यात आली आहे. तसेच शॉपिंग मॉल संदर्भातही महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. शॉपिंग मॉलमध्ये प्रवेश देताना ग्राहकांना दिलेल्या निर्बंधाचे उल्लंघन होणार नाही. तसेच सर्व नियमाचे पालन करावे असे आदेश पालिका आयुक्तांनी मॉल व्यवस्थापनांना दिले आहेत.

दरम्यान,  सद्या शहरात टाळेबंदी लागू करण्यासारखी परिस्थिती नाही. पण, नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही आणि रुग्ण संख्या वाढतच राहिली तर  टाळेबंदी करावी लागेल, असा इशारा आयुक्तांना दिला आहे.



हेही वाचा -

मुंबईत २३७७ नवे रुग्ण; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला

मुंबईत लॉकडाऊन नाही, कडक निर्बंध लावणार - अस्लम शेख

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा