Advertisement

निवडणुकीत तुमच्या बोटावर वापरली जाणारी 'शाई' अशी बनते


निवडणुकीत तुमच्या बोटावर वापरली जाणारी 'शाई' अशी बनते
SHARES

मतदान करताना तुमच्या बोटावर एक शाई लावण्यात येते.  या शाईवरून तुम्ही मतदान केलं आहे हे समजून येतं. कित्येक दिवस ही शाई तशीच राहते. पण ही शाई नेमकी कुठून येते? बनते कशी? केव्हापासून लावली जाते? हे तुम्हाला माहीत आहे का?  

कुठे तयार होते शाई?

तुमच्या बोटावर लावण्यात येणारी शाई मैसूरमधील मैसूर पेंट्स अँड वॅर्निश लिमिटेड कंपनी तयार करते. कृष्ण राज वोडियार या मैसूरच्या राजानं या कंपनीची स्थापना केली होती. त्याकाळी या प्रकारची शाई तयार करणारी ही एकमेव कंपनी होती. भारताला स्वातंत्र मिळाल्यानंतर या मैसूर पेंट्सचं रूपांतर सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीत करण्यात आलं.


'असा' झाला वापर?

भारतात पहिल्यांदा लोकसभा आणि विधानसभा निवडणुका १९५२ साली झाल्या. या निवडणुकी दरम्यान बोगस मतदान हा प्रकार लक्षात आला. त्यावर उपाय म्हणून निवडणूक आयोगानं १९६२ साली तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत या शाईचा वापर करण्यात आला.


शाईचा गोपनीय फॉर्म्युला 

नॅशनल फिजीकल सोसायटीमधल्या डॉ. एम. एल. गोयल यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांनी ही विशिष्ट शाई तयार केली आहे. या शाईचा फॉर्म्युला अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला आहे. फक्त या शाईबद्दल एवढंच सांगू शकतो की यात २५ टक्के सिल्वर नायट्रेट असतं. आपल्या बोटावर लावताच त्वचेमधल्या प्रथिनांशी त्या क्षाराची रासायनिक क्रिया होते. त्यामुळे बोटावर लावताच एक-दोन दिवसात त्याचा काळा रंग तयार होतो. या शाईचं वैशिष्ट्य म्हणजे ही शाई बोटावरून खोडली जात नाही. साधारण ३-४ आठवडे तरी शाई बोटावर राहते.



हेही वाचा

'असे' शोधा तुमच्या घराजवळील मतदान केंद्र

भारतात अशी झाली पहिली निवडणूक, निवडणुकीसाठी लागले ५ महिने

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा