Advertisement

पालिका मालमत्ता करात मोठी वाढ करण्याची शक्यता

गेल्या तीन वर्षांपासून हा निर्णय रखडला आहे.

पालिका मालमत्ता करात मोठी वाढ करण्याची शक्यता
SHARES

आगामी काळात मुंबईकरांना महागाईचा आणखी एक फटका बसू शकतो. यंदा मुंबईत मालमत्ता कर वाढवण्याचा निर्णय बीएमसी घेऊ शकते. गेल्या तीन वर्षांपासून हा निर्णय प्रलंबित होता. कोरोनामुळे बीएमसीने यावर कोणताही निर्णय घेतला नव्हता. मात्र, आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पाहता सरकार याला काही काळ स्थगिती देऊ शकते.

15 टक्के करवाढीचा प्रस्ताव

बीएमसी गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मालमत्ता कर वाढ करण्याच्या विचारात आहे. सुमारे 15 टक्के करवाढीचा प्रस्ताव आहे. मुंबई महापालिकेने 2023 ते 2025 या दोन वर्षांसाठी कर वाढवण्याची तयारी सुरू केली आहे.

सुमारे 15 टक्के करवाढ प्रस्तावित असून यावर्षी कर आकारणीत बदल होणार आहेत. या कर आकारणीमुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंटची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईतील मालमत्ता कर दर पाच वर्षांनी वाढतो. 2015 मध्ये मालमत्ता करात वाढ करण्यात आली. यानंतर 2020 मध्ये वाढ अपेक्षित होती. पण कोरोना संकटामुळे 2020 आणि 2021 मध्ये कर वाढवण्यात आला नाही. 2022 मध्ये महापालिका निवडणुका होण्याची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करवाढ पुढे ढकलण्यात आली. 

त्यानंतर 2023 ते 2025 या पुढील दोन वर्षांसाठी करवाढ करण्याचा प्रस्ताव असून त्याचा मसुदा पालिकेच्या कर आकारणी व संकलन विभागाकडून तयार करण्यात येत आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. बीएमसीचा हा प्रस्ताव राज्य सरकारने मान्य केल्यास मुंबईकरांना आणखी एक महागाईचा फटका बसणार आहे.



हेही वाचा

शुक्रवारी ठाण्यातल्या काही भागात पाणीपुरवठा खंडित

'मुंबई दर्शन' बस 5 ऑक्टोबरपासून बंद

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा