Advertisement

शेवग्यामुळे इडली सांबारचा नाश्ता महाग होणार

सांबारातील प्रमुख घटक असलेल्या शेवग्याच्या शेंगांचे दर तब्बल 400 रुपये किलोवर पोहोचल्याने आता सांबारचेही दर वाढणार असल्याची माहिती उडुपी हॉटेल व्यावसायिकांनी दिली आहे.

शेवग्यामुळे इडली सांबारचा नाश्ता महाग होणार
SHARES

सकाळचा सकस, पौष्टिक आणि खिशाला परवडणारा नाश्ता म्हणून इडली-सांबारकडे (Idli sambar) पाहिले जाते. मात्र आता हा सकाळचा नाश्ता महाग होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

सांबारातील प्रमुख घटक असलेल्या शेवग्याच्या शेंगांचे (drumstick) दर तब्बल 400 रुपये किलोवर पोहोचल्याने आता सांबारचेही दर वाढणार असल्याची माहिती उडुपी हॉटेल व्यावसायिकांनी दिली आहे.

यंदा राज्यात (maharashtra) झालेल्या जोरदार पावसामुळे लाखो हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत अनेक पिके शेतातच सडून गेली. परिणामी त्याचा थेट परिणाम भाज्यांच्या दरावर झाला आहे.

अनेक भाज्यांचे दर सध्या वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे. रक्तदाब, सांधेदुखी आदींसाठी उपयुक्त आणि व्हिटामिन्सने समृद्ध असलेल्या शेवग्याच्या शेंगा तर अक्षरशः गगनाला भिडल्या आहेत.

बदलत्या हवामानाचा फटका शेवग्यालाही बसला आहे. नवीन पिकाचा हंगामही लांबला आहे. ठाण्यात शेवग्याच्या शेंगा सहज उपलब्ध नाही.

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये (APMC market) मात्र शेवगा मिळतो. परंतु दर तब्बल 400 रुपये प्रति किलो असल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेला आहे.

त्यामुळे बहुतेक ठिकाणी केवळ उडुपी हॉटेल व इतर व्यावसायिकच शेवग्याची खरेदी करत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

थंडीच्या दिवसांत शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी मानल्या जातात. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातही त्याला प्राधान्य दिले जाते.

मात्र कमी झालेल्या आवकीमुळे दर गगनाला भिडले आहेत. नवी मुंबईतील (navi mumbai) एपीएमसी मार्केटमध्ये आवक कमी असल्यानेच 400 रुपये किलो हा दर स्थिरावल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.



हेही वाचा

कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारतींबाबत नगरविकास विभागाची बैठक

महाराष्ट्र सरकारकडून भजन मंडळांना निधी मंजूर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा