SHARE

जीटीबीनगर - शंकर याज्ञिक मार्गावरील रोशनबागेजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या जाणवते आहे. या विभागात होणाऱ्या बेकायदा पार्किंगमुळे जास्त वाहतूक कोंडी होते, असं स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे. अनेक वाहनचालक येथे गाड्या उभ्या करतात आणि त्यानंतर महिनोमहिने त्या गाड्यांकडे बघतही नाहीत, असं स्थानिकांकडून सांगण्यात येतंय. 5 नोव्हेंबरला शीव वाहतूक पोलिसांकडून बेकायदा पार्किंग केलेल्या टॅक्सी आणि मोटारसायकली ताब्यात घेण्यात आल्या. स्थानिकांनी वारंवार केलेल्या तक्रारीनंतर वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली. तर मी दिलेल्या पत्रानंतरही पोलिसांकडून वाहतूक समस्येबाबत अजून काहीच हालचाल झालेली नाही, असं भाजपा आमदार सरदार तारासिंह यांनी स्पष्ट केलंय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या