फुटपाथ झालं अवैध पार्किंगमध्ये गुडूप

चेंबूर - फुटपाथ नेमकं कुणाचं? पादचाऱ्यांचं की जुन्या वाहनांची विक्री करणाऱ्या माफियांचं? असा प्रश्ना सध्या चेंबूरकरांना पडलाय. चेंबूरमध्ये अवैधरित्या गाड्यांची पार्किंग केल्याचं दिसून येतंय. ही पार्किंग केलीय कार विक्रीचा अवैधरित्या धंदा करणाऱ्या माफियांनी. रस्त्याच्या कडेला जर नो पार्किंगमध्ये गाडी लावली तर अनेकदा कारवाई होताना आपण पाहतो. मात्र इकडे चित्र उलटं आहे. बिनदिक्कतपणे विक्रीच्या गाड्यांची अवैध पार्किंग असतानाही पोलीस दुर्लक्ष करतात आणि याचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागतोय. विशेष म्हणजे या अनधिकृत पार्किंगचे चित्रिकरण करण्यासाठी मुंबई लाइव्हचा प्रतिनिधी गेला असता, त्यालाही या माफियांनी अडवण्याचा प्रयत्न केला. सर्वसामन्यांना जो कायदा लावला जातो, तोच कायदा या माफियांना का लावला जात नाही? या माफियांना नेमकं अभय कुणाचं मिळतंय, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेत.​

 

Loading Comments