खेळाचे मैदान बनलंय अनधिकृत पार्किंगचं ठिकाण

 Chembur
खेळाचे मैदान बनलंय अनधिकृत पार्किंगचं ठिकाण

चेंबूर - येथील वाशीनाका येथे एमएमआरडीएच्य़ा मैदानावर अनधिकृत पार्किंग सुरू करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. अनेक वर्षं लहान मुलं खेळण्यासाठी या मैदानाचा वापर करत होती. मात्र या अनधिकृत पार्किंगमुळे मुलांना खेळण्यासाठी मैदानच शिल्लक राहिलेलं नाही. विशेष म्हणजे, स्थानिक रहिवासी प्रकाश जाधव यांनी याबाबत एमएमआरडीएशी पत्रव्यवहारही केलाय, मात्र त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. या पार्किंगकडे एमएमआरडीएकडून दुर्लक्षच होतंय, असं त्यांचं म्हणणं आहे.

Loading Comments