Advertisement

मुंबईत मंगळवारी होणार मान्सूनचे आगमन, हवामान खात्याचा अंदाज

मागील काही दिवस मान्सूनच्या प्रतिक्षेत असणाऱ्या मुंबईकारांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुंबईत मंगळवारी मान्सूनचे आगमन होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे.

मुंबईत मंगळवारी होणार मान्सूनचे आगमन, हवामान खात्याचा अंदाज
SHARES

मागील काही दिवस मान्सूनच्या प्रतिक्षेत असणाऱ्या मुंबईकारांसाठी एक दिलासादायक बातमी आहेमुंबईत मंगळवारी मान्सूनचे आगमन होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. मात्र, सोमवारीचं मुंबईत पावसाच्या हलक्या सरी बरसायला सुरूवात झाली आहे. मुंबईत पहाटेपासूनच ढगाळ वातावरण अाहे.

पावसाच्या हलक्या सरी

मुंबईत ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसू लागल्यानं उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकराला दिलासा मिळाला आहे. सोमवारी सकाळच्या सुमाराला दक्षिण मुंबईत पावसानं हजेरी लावली. ढगाळ वातावरण तयार झाल्यानं मुबईत पहाटेपासूनच हवेत गारवा जाणवत आहे. छत्तीसगड आणि आसपासच्या क्षेत्रात चक्रिय वात स्थितीमुळं मुंबईत पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

मुंबईकरांना दिलासा

मुंबईत काही दिवसांपूर्वी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली होती. आठवडाभर पडलेल्या या पावसामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला. परंतु, त्यानंतर पाऊस न पडल्यानं मुंबईकरांना प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो आहे

५० टक्के कमी पाऊस

भारतीय हवामान विभागानं रविवारी जाहीर केलेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार मुंबईती आतापर्यंत सरासरीहून ६६ टक्के पाऊस कमी पडला आहे. तर उपनगरांमध्ये ५० टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कुलाबा आणि सांताक्रूझमधील नोंदीनुसार १ जूनपासून पडलेला पाऊस हा अनुक्रमे ९४.२ आणि ९४.४ मिलीमीटर अधिक होता.



हेही वाचा -

मध्ये रेल्वेच्या ढिसाळ कारभाराविरोधात प्रवासी संघटना करणार आंदोलन

पाण्याचं बिल थकवल्यानं मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला डिफॉल्टर यादीत



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा