Advertisement

मुंबईतील भिकाऱ्यांची संख्या कमी करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यासंदर्भात माहिती दिली.

मुंबईतील भिकाऱ्यांची संख्या कमी करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील
SHARES

मुंबईत गेल्या काही वर्षांमध्ये भिकाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मुंबई भिकारीमुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. 

दीपक केसरकर म्हणाले की, भिकारीमुक्त मुंबई हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यासोबतच अंमली पदार्थमुक्त मुंबई अभियान सुरू करत असल्याचेही त्यांनी सांगितले. मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, सध्या मुंबईच्या विकासाबाबत अनेक निर्णय घेतले जात आहेत. 

मुंबईत शौचालयांची समस्या आहे. त्यासाठी 30 कोटी रुपये देण्यात आले आहेत. यासाठी आम्ही युनिलिव्हरला काम दिले असल्याचे केसरकर यांनी सांगितले. 

यासोबतच मुलांसाठी राणीबागेपर्यंत डबल डेकर बसही आणणार आहोत. राणीच्या बागेत लहान मुले फिरू शकतात, असेही त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मी दर बुधवारी मुंबई महापालिकेत येणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले. 

सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस ते मुंबईत राहणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना राबविण्यात येत आहे. मुंबई हे महान शहर व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आमच्याकडे कोळीवाडे आहेत पण त्यांची दखल घेतली जात नाही. काही नवीन संकल्पना घेऊन यायच्या आहेत. तीन कोळीवाडे ट्रायल म्हणून घेतले आहेत. आम्ही काही बदल करणार आहोत, असे केसरकर म्हणाले.



हेही वाचा

मुंबई : बदलत्या वातावरणामुळे आरोग्याच्या तक्रारीत वाढ

महाराष्ट्रातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी 'लेक लाडकी योजना'!

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा