Advertisement

चारचाकी गाड्या वाहून नेण्यासाठी प्रोटोटाइप डबा, मध्य रेल्वेचा प्रयोग

विविध प्रकारच्या गाड्यांसाठीच नव्हे तर पार्सल वाहतूकीसाठी देखील वापरले जाऊ शकतात.

चारचाकी गाड्या वाहून नेण्यासाठी प्रोटोटाइप डबा, मध्य रेल्वेचा प्रयोग
SHARES

मध्य रेल्वेनं चारचाकी गाड्यांची वाहतूक करण्यासाठी प्लॅटफॉर्मच्या बाजूनं उघडता येणारे आणि इतर सुधारित वैशिष्ट्यांसह एक प्रोटोटाइप डबा विकसित केला आहे. आरडीएसओ आणि ऑटोमोबाईल उत्पादकांच्या सहकार्यानं हा डबा बनवण्यात आला आहे.   

वापरातून काढून टाकलेल्या आणि वापरात नसलेल्या प्रवासी डब्ब्यांपासून मध्य रेल्वेनं ११० किमी प्रति तास वेग क्षमता आणि १८ टनाच्या जास्त भार क्षमता असलेला हा डबा तयार केला आहे. विविध प्रकारच्या गाड्यांसाठीच नव्हे तर पार्सल वाहतूकीसाठी देखील वापरले जाऊ शकतात.

ही आहेत वैशिष्ट्ये 

• रूंद उघडणारे दरवाजे
• चेकर्ड शीटसह मजबूत फ्लोरींग
• नैसर्गिक पाईप लाईट
• मार्गदर्शनासाठी फरसबंदी मार्कर आणि रेट्रो रिफ्लेक्टिव्ह टेप.
• सहज प्रवेशासाठी फॉल प्लेटची सुधारित व्यवस्था
• लॉकिंग सुलभतेसाठी बॅरल लॉकसह टोकाकडील दरवाजाचे सुधारित डिझाइन


आरडीएसओ, लखनौ यांच्या संयुक्त विद्यमानं हे डबे मध्य रेल्वेच्या परळ वर्कशॉपद्वारे केवळ ३० दिवसांच्या विक्रमी वेळेत विकसित करण्यात आले आहेत.

मध्य रेल्वेवर ऑटोमोबाईल वाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. २०१९-२० मध्ये ११८ डबे लोड केले गेले होते. जे २०२०-२१ मध्ये वाढून २८७ डबे झाले.

या वर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत मध्य रेल्वेनं २०० गाड्या वाहून नेणारे डबे लोड केले जे मागील वर्षीच्या याच कालावधीच्या (८६ डबे) तुलनेत १३३% अधिक आहेत. त्यामुळे हा नवीन प्रोटोटाईप डब्याचा खूप फायदा मध्य रेल्वेला होईल अशी माहिती अनिल कुमार लाहोटी यांनी दिली.

ऑटोमोबाईल प्रामुख्यानं पुणे विभागातील चिंचवड, भुसावळमधील नाशिक, नागपुरातील अजनी आणि मुंबई विभागातील कळंबोली इथून लोड केले जातात. अलीकडे, फर्रुखाबाद, ओखला, कपिलास रोड इत्यादी नवीन ठिकाणे जोडली गेली आहेत.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा