वरळी (worli) ते कफ परेड (cuff parade) पर्यंतच्या मुंबई (mumbai) मेट्रो लाईन 3 (Aqua line) च्या अंतिम टप्प्याच्या उद्घाटनानंतर सकाळी अनेक प्रवाशांची प्रवासादरम्यान मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने निराशा झाली.
प्रवाशांनी तक्रार केली की त्यांना नव्याने सुरू झालेल्या भूमिगत कॉरिडॉरमध्ये UPI पेमेंट करता येत नाही. तसेच ऑनलाइन तिकिटे बुक करता येत नाहीत किंवा अगदी साधे फोन कॉल देखील करता येत नाहीत.
नेटवर्क खंडित झाल्यामुळे एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन आयडियासह सर्व प्रमुख टेलिकॉम ऑपरेटर्सच्या वापरकर्त्यांवर परिणाम झाला. ज्यामुळे मुंबईतील पहिल्या पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्गाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
अनेक प्रवाशांना प्रवासादरम्यान डिजिटल व्यवहार आणि मोबाईलवरून तिकीट काढताना गैरसोईचा सामना करावा लागला.
मे 2025 मध्ये बीकेसी ते वरळी पर्यंत मुंबई मेट्रो फेज 2 (mumbai metro phase 2) सुरू झाल्यानंतरही अशीच समस्या उद्भवली होती.
वाढत्या तक्रारींना प्रतिसाद म्हणून, एमएमआरसीने तात्पुरती मदत उपाय, स्थानकांमधील कॉन्कोर्स पातळीवर मोफत वाय-फाय कनेक्टिव्हिटीची घोषणा केली होती.
हेही वाचा