Advertisement

मुंबईकरांना पालिका देणार मोफत रोपटी


मुंबईकरांना पालिका देणार मोफत रोपटी
SHARES

पर्यावरणाच्या दृष्टीने आणि वृक्षारोपणाचे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेता महापालिकेने सोसायटींच्या आवारात, शाळा,  महाविद्यालये, व्यावसायिक आस्थापना इत्यादी खाजगी परिसरात झाडे लावण्यासाठी जुलै महिन्यात २५ हजार देशी झाडांची रोपटी विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला आहे.  महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमध्ये झाडांची रोपटी मिळणार आहेत.


झाडे जगवण्याची हमी

२४ विभाग कार्यालयांमध्ये प्रत्येकी १ हजार याप्रमाणे एकूण २४ हजार रोपट्यांची व्यवस्था यापूर्वीच करण्यात आली आहे. तर १ हजार रोपटी ही 'वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान' अर्थात राणीच्या बागेतील मुख्य 'नर्सरी' मध्ये आहेत. याबाबत सुयोग्य समन्वय साधण्यासाठी महापालिकेच्या  उद्यान अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. मात्र, विनामूल्य रोपटी घेताना ती झाडे जगविण्याची हमी संबंधित नागरिकाला घ्यावी लागणार आहे.

पालिका लावणार १० हजार झाडे

या २५ हजार रोपट्यांव्यतिरिक्त महापालिकेच्या अखत्यारितील जागेत १० हजार रोपटयांची लागवड करण्यात येणार आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात पर्यावरणाला पूरक अशा देशी झाडांची लागवड अधिकाधिक संख्येने व्हावी, ती झाडे जगावी - वाढावी, पर्यायाने मुंबईतील पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेचे उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.


ही झाडे लावणार

खाजगी व महापालिका परिसरात झाडे लावताना मुंबईच्या स्थानिक पर्यावरणाला अनुकूल ठरतील, अशाच प्रकारची झाडे प्राधान्याने लावण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याचे राज्य पुष्प असणा-या तामण, समुद्रफुल, शेवर, काशिद, कारंज, जंगली बदाम, आवळा, नागकेशर, कमंडलू, बकुळ, अर्जुन, पुत्रंजीव, रोहितक, बहावा (अमलताश), पेल्टोफोरम, कडूलिंब, सीता अशोक, सुरु, पिंपळ यासारख्या झाडांचा समावेश आहे.



हेही वाचा -

फेरीवाल्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर, यांना अभय कुणाचा?

लेप्टोने आतापर्यंत घेतले तीन बळी


 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा