Advertisement

महिलांच्या सुरक्षिततेसाठी मुंबईतील सीसीटीव्हीचं जाळं आता आणखी मजबूत


महिलांच्या सुरक्षिततेसाठी मुंबईतील सीसीटीव्हीचं जाळं आता आणखी मजबूत
SHARES

मुंबईसह देशात महिलांवरील अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर दुसरीकडे महिलांवरील अत्याचार रोखण्यात पोलिसांना म्हणावं तसं यश येताना दिसत नाही. ही बाब लक्षात घेता केंद्र सरकारनं महिलांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घेत देशातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये 'सुरक्षित शहर योजना' राबण्याचा निर्णय घेतला. केंद्राच्या या सुरक्षित शहर योजनेत देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या मुंबईचाही समावेश आहे. त्यानुसार केंद्राची ही सुरक्षित शहर योजना लवकरात लवकर मुंबईत राबवण्याचा निर्णय घेत मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यानुसार लवकरच या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरूवात करत मुंबईतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती गृहविभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे. 


मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील

केंद्र सरकारच्या सुरक्षित शहर योजनेंतर्गत दिल्ली, हैद्राबाद, लखनऊ, कोलकत्ता, चेन्नई, बंगळूरू, अहमदाबाद आणि मुंबई या शहरांमधील सुरक्षाव्यवस्था मजबुत करत महिलांवरील अत्याचार रोखण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यानुसार शहरांमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवणे, कम्युनिटी पोलिसिंगला चालना देणे आणि सोशल मिडीयावरील गुन्ह्यांना रोख्यासाठी विशेष प्रयत्न करणे असं या योजनेचं स्वरूप आहे. अशी ही महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणारी ही योजना आता लवकरच मुंबईत राबवली जाणार आहे. मंत्रिमंडळाचा या योजनेला हिरवा कंदिल मिळाल्यानं ही योजना राबवण्याचा मार्ग आता मोकळा झाल्याचंही या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.


२५२ कोटींची योजना

मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी या योजनेंतर्गत राज्य सरकारला केंद्राकडून ६० टक्क्यांचा निधी उपलब्ध होणार आहे. तर उर्वरित ४० टक्क्यांचा निधी राज्य सरकारला उभारावा लागणार आहे. त्यानुसार २५२ कोटींचा खर्च मुंबईत सुरक्षित शहर योजनेसाठी केला जाणार आहे. यातील १०० कोटी ८० लाखांचा निधी राज्य सरकार तर १५१ कोटी २० लाखांचा निधी केंद्र सरकार उभारणार आहे. सीसीटीव्ही यंत्रणा मजबुत करण्याबरोबरच महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांकडून अन्यही उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहितीही गृहविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे. तर यामुळे नक्कीच महिलांवरील अत्याचारांचा आकडा कमी होण्यास मदत होईल असा दावाही केला आहे.


हेही वाचा -

अभिनेता आदित्य पांचोलीच्या अडचणीत वाढ

हिप्नोटाईज करून लुटणारी टोळी जेरबंद



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा