Advertisement

ठाण्याच्या धरणक्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ

हंगामातील एकूण पर्जन्यमान 268 मिमीवर पोहोचले आहे. भातसा धरणातूनही सध्या कोणताही पाण्याचा विसर्ग सुरू नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

ठाण्याच्या धरणक्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ
SHARES

उशिराने सुरू झालेल्या पावसाने आता ठाण्यात (thane)चांगलाच जोर धरला आहे. शहरासह धरण क्षेत्रातही समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील जलसाठ्यातही वाढ (water storage) होऊ लागली आहे.

गुरुवारी सकाळी 8.30 ते दुपारी 1.30 या अवघ्या पाच तासांत ठाणे शहरात 32.01 मिमी पावसाची नोंद झाली. यामुळे यंदाच्या हंगामातील एकूण पर्जन्यमान 601.28 मिमीवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 865.15 मिमी पाऊस झाला होता.

मुसळधार पावसाच्या (heavy rainfall) पार्श्वभूमीवर शहरातील काही पूर्व-प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती.

यापूर्वीच्या 24 तासांत (1 जुलै सकाळी 8.30 ते 2 जुलै सकाळी 8.30) शहरात तब्बल 157.93 मिमी पावसाची नोंद झाली होती.

या मुसळधार पावसामुळे ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे एकूण 74 तक्रारी प्राप्त झाल्या.

त्यामध्ये 20 ठिकाणी झाडे पडणे, 15 ठिकाणी झाडांच्या फांद्या पडणे, 13 धोकादायक झाडांबाबत तक्रारी, 20 ठिकाणी पाणी साचणे, एका ठिकाणी आग लागणे, एका इमारतीचा काही भाग कोसळण्याची घटना, पाणीवाहिनी गळतीची एक तक्रार तसेच इतर तीन तक्रारींचा समावेश होता.

दरम्यान, गुरुवारी दुपारनंतरही अधूनमधून पावसाच्या सरी सुरू असल्याने प्रशासनाकडून शहरातील विविध भागांतील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि महापालिकेची यंत्रणा सतर्क असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

2 जुलै रोजी सकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार मोरबे धरणात 26.90 टक्के, मोरबे धरणाची एकूण साठवण क्षमता 190.890 दशलक्ष घनमीटर (एमसीएम) आहे.

सध्या धरणात 51.354 एमसीएम (26.90 टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणाची पाणीपातळी 69.67 मीटर इतकी आहे.

गेल्या 24 तासांत धरण क्षेत्रात 154.40 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हंगामातील एकूण पर्जन्यमान 425.20 मिमी इतके झाले आहे. धरणाचे दोन्ही रेडियल दरवाजे सध्या बंद आहेत.

भातसा धरणाची (bhatsa dam) एकूण पाणीसाठा क्षमता 300.045 दशलक्ष घनमीटर आहे. त्यापैकी 266.045 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.

धरणाची पाणीपातळी 108.10 मीटर इतकी आहे. गेल्या 24 तासांत धरण क्षेत्रात 52 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

हंगामातील एकूण पर्जन्यमान 268 मिमीवर पोहोचले आहे. भातसा धरणातूनही सध्या कोणताही पाण्याचा विसर्ग सुरू नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.



हेही वाचा

सांताक्रूझमध्ये झाड कोसळून आठ जण जखमी

मुंबईतील 27 वॉर्डमध्ये उभारले जाणार भूमिगत पार्किंग

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा