Advertisement

१० वी, १२ वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची संधी

इच्छुक उमेदवारांना ९ जानेवारीपर्यंत आॅनलाइन अर्ज करता येतील. अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागतील. आॅनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना www.rrcecr.gov.in या संकेतस्थळावर लाॅग इन करावं लागेल. जिथं उमेदवाराला फाॅर्ममध्ये आवश्यक सर्व तपशील आणि ज्या पदासाठी अर्ज करत आहे, ते पद नमूद करावं लागेल.

१० वी, १२ वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची संधी
SHARES

रेल्वे बोर्डाने १० वी आणि १२ वी पास झालेल्या उमेदवारांना रेल्वेत नोकरी करण्याची संधी उपलब्ध करून देत विविध पदांसाठी १० हजार अर्ज मागवले आहेत. ही पदं मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, उत्तर पूर्व रेल्वे, दक्षिण पश्चिम रेल्वेत भरण्यात येणार आहेत.

कुठे करता येईल अर्ज?

इच्छुक उमेदवारांना ९ जानेवारीपर्यंत आॅनलाइन अर्ज करता येतील. अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागतील. आॅनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना www.rrcecr.gov.in या संकेतस्थळावर लाॅग इन करावं लागेल. जिथं उमेदवाराला फाॅर्ममध्ये आवश्यक सर्व तपशील आणि ज्या पदासाठी अर्ज करत आहे, ते पद नमूद करावं लागेल.

शिक्षण अर्हता काय?

इच्छुक उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेत कमीत कमी ५० टक्के गुण मिळवलेले असावेत. सोबतच इच्छुक उमेदवाराकडे आयआयटी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.

हेही वाचा-

डॉ. होमी भाभा युनिव्हर्सिटीला मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता

पश्चिम रेल्वेच्या मेल, एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना करता येणार शॉपिंग

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा