डॉ. होमी भाभा युनिव्हर्सिटीला मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता

मुंबईतील कुलाबा परिसरात महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रूसा) अंतर्गत डॉ. होमी भाभा या क्लस्टर विद्यापीठाचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी मांडण्यात आला होता. त्यासाठी ५५ कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला असून नुकतचं तो प्रस्ताव मंत्रीमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.

SHARE

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरूवारी राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत येत्या काही दिवसात मुंबईत डॉ. होमी भाभा युनिव्हर्सिटी स्थापना करण्यात येणार असल्याची महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. त्याशिवाय स्वयंअर्थसहाय्यीत विद्यापीठांच्या मनमानी कार्यपद्धतीला चाप बसवण्यासाठी विद्यापीठाच्या मार्गदर्शक सुचनांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 


शैक्षणिक दर्जा वाढणार

मुंबईतील कुलाबा परिसरात महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रूसा) अंतर्गत डॉ. होमी भाभा या क्लस्टर विद्यापीठाचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी मांडण्यात आला होता. त्यासाठी ५५ कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला असून नुकतचं तो प्रस्ताव मंत्रीमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. या समूह विद्यापीठामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हे महत्त्वाचे कॉलेज असणार असून त्यासोबत सिडनहॅम कॉलेज, एल्फिन्स्टन कॉलेज, शासकीय शिक्षणशास्त्र कॉलेजचा समावेश असणार आहे. या विद्यापीठामुळं शैक्षणिक दर्जा वाढण्यास मोलाची मदत होणार असून रोजगार निर्मिती पुरक अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहे. 


अधिष्ठाता पदांना मान्यता 

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ मधील तरतूदीनुसार राज्यातील अकृषी विद्यापीठांसाठी विद्याशाखा अधिष्ठाता (फॅकल्टी डिन) या पदांना मान्यता देण्यात आली आहे. ५ मोठ्या विद्यापीठांमध्ये प्रत्येकी ४ याप्रमाणे २० अधिष्ठाता पदांना मान्यता देण्यात आली असून, इतर ६ अकृषी विद्यापीठांना २ याप्रमाणे १२ अधिष्ठाता पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील विद्यापीठांमध्ये ३२ विद्याशाखा अधिष्ठाता या पदांना मान्यता देण्यात आली असून, उर्वरित १२ अधिष्ठाता पदांना मंत्रिमंडळाने तत्वत: मान्यता देण्यात आली आहे.


विविध अभ्यासक्रम

 स्वयंअर्थसहाय्यीत विद्यापीठांच्या मनमानी कार्यपद्धतीला चाप बसवण्यासाठी विद्यापीठाच्या मार्गदर्शक सुचनांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या विद्यापीठामध्ये आता कौशल्य विकास, क्रीडा, औषध, वस्त्रोद्योग, कृषी, पशुसंवर्धन, मत्स्य संवर्धन विकास इत्यादी अभ्यासक्रमांचा समावेश करण्यास विद्यापीठांना मान्यता देण्यात आली आहे. हेही वाचा - 

आयआयटीच्या प्लेसमेंटमध्ये ११२२ विद्यार्थ्यांची नोकरी पक्की

मुंबई विद्यापीठात परंपरा महोत्सव व आदिवासी साहित्यावर राष्ट्रीय चर्चासत्र
संबंधित विषय
ताज्या बातम्या