Advertisement

मुंबई विद्यापीठात परंपरा महोत्सव व आदिवासी साहित्यावर राष्ट्रीय चर्चासत्र


मुंबई विद्यापीठात परंपरा महोत्सव व आदिवासी साहित्यावर राष्ट्रीय चर्चासत्र
SHARES

मुंबई विद्यापीठाची लोककला अकादमी, शाहीर अमरशेख अध्यासन, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, साहित्य अकादमी, डाॅ. रा.चिं.ढेरे संस्कृती संशोधन केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमानेे कलिना कॅम्पसमध्ये कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा भवनात  २२ व २३ डिसेंबर रोजी परंपरा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. 


प्रमुख पाहुणे शिवमणी

पश्चिम भारतीय आदिवासी साहित्यांवर राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं असून याचं उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण व गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्रजी वायकर यांच्या हस्ते २२ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता करण्यात येणार आहे.  या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आंतरराष्ट्रीय तालवाद्य वादक शिवमणी असून अध्यक्ष मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर असणार आहेत. या कार्यक्रमातील चर्चासत्राचे उद्घाटन २३ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. 


आदिवासी नृत्य

संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात राजस्थानचे गैर नृत्य, चक्री नृत्य, महाराष्ट्राचे बोहाडा आणि सोंगी मुखवटे, गुजरातचे राठवा नृत्य, सिद्धी धमाल, कर्नाटकचे ढोलु कुनिथा नृत्य, मध्यप्रदेशचे बैगा परधोनी नृत्य, आंध्रप्रदेशचे थपेटागुल्लू नृत्य, छत्तीसगढचे गैर माडिया नृत्य या आदिवासी नृत्यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी एलआयसी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र अध्ययन केंद्र, मुंबई विद्यापीठ यांचे सहकार्य लाभले असून हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे. 



हेही वाचा - 

मुंबई विद्यापीठाच्या निकालांत पुन्हा घोळ? ७६, ८२८ पुनर्मूल्यांकन अर्ज दाखल

मराठीच्या गुणवत्ता वाढीसाठी ३०० शाळांमधील शिक्षक एकवटले




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा