Advertisement

मुंबई विद्यापीठाच्या निकालांत पुन्हा घोळ? ७६, ८२८ पुनर्मूल्यांकन अर्ज दाखल

परंतु मे २०१८ मध्ये पुनर्मूल्यांकनासाठी अर्जात पुन्हा एकदा वाढ झाली असून सर्व शाखेतील मिळून जवळपास ७६ हजार ८२८ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. दरम्यान पुनर्मूल्यांकनासाठीच्या अर्जात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं यामुळे स्पष्ट होत आहे.

मुंबई विद्यापीठाच्या निकालांत पुन्हा घोळ? ७६, ८२८ पुनर्मूल्यांकन अर्ज दाखल
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जांच्या संख्येत वाढ झाल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकार कायद्या (आरटीआय) तून समोर आली आहे. यामुळे पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाच्या पेपर तपासणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.


पुनर्मूल्यांकनाची सुविधा

मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर विद्यर्थ्यांना मनासारखे गुण न मिळाल्यास किंवा एखाद्या पेपरमध्ये नापास झाल्यास उत्तरपत्रिकांचं पुनर्मूल्यांकन करण्याची सुविधा देण्यात येते. या सुविधेनुसार विद्यार्थी काही ठराविक रक्कम भरून उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनासाठी टाकतात.

शौमितकुमार साळुंके यांनी जून २०१७ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत मुंबई विद्यापीठातील सर्व शाखांमधील उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी किती अर्ज आले? याबाबतची माहिती विद्यापीठाकडून मागवली होती.


किती अर्ज दाखल?

विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, मे २०१७ साली सर्व शाखेतील जवळपास ८५ हजार ०६८ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर ऑक्टोबर २०१७ मध्ये एकूण ६० हजार ७१२ विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल केले असून त्यात २० ते २५ हजारांनी घट झाली होती.


अर्जांत वाढ

परंतु मे २०१८ मध्ये पुनर्मूल्यांकनासाठी अर्जात पुन्हा एकदा वाढ झाली असून सर्व शाखेतील मिळून जवळपास ७६ हजार ८२८ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. दरम्यान पुनर्मूल्यांकनासाठीच्या अर्जात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं यामुळे स्पष्ट होत आहे. काही महिन्यापूर्वी विद्यापीठाच्या निकाल वेळेत जाहीर झाल्याने विद्यापीठ प्रशासनाने स्वत: ची पाठ थोपटून घेतली होती. मात्र अशा प्रकारे विद्यापीठाचे निकाल वेळेत लागत असतील तर ही धक्कादायक बाब आहे.

मुंबई विद्यापीठाने दिलेल्या आकडेवारीनुसार, विद्यापीठाच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्जात दिवसेंदिवस वाढ होत असून विद्यार्थ्यांचा पेपर तपासणीच्या प्रक्रियेवरून विश्वास कमी होत चालला आहे. त्यामुळे विद्यापीठाने विद्यर्थ्यांच्या भविष्याशी न खेळता व्यवस्थित पेपर तपासणी करावी जेणेकरून पुनर्मूल्यांकनासाठी अर्जात घट होईल.
-शौमितकुमार साळुंके, विद्यार्थी, एम. फिल.


विद्यापीठाने पुनर्मूल्यांकनासाठीच्या एका पेपरमागे लागणारी
फी ५०० रुपयांहून २५० रुपये केली आहे. त्यामुळे परीक्षेत मिळणाऱ्या गुणावरून नाखूष असणारे अनेक विद्यर्थी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करत असल्याने या संख्येत वाढ झाली आहे.
- विनोद मळाले, जनसंपर्क अधिकारी, परीक्षा विभाग



हेही वाचा-

पाटकर, खालसा काॅलेजांना स्वायत्तता

मुंबई विद्यापीठात हिप-पॉप अभ्यासक्रम



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा