Advertisement

मुंबई विद्यापीठात हिप-पॉप अभ्यासक्रम

येत्या जानेवारी महिन्यापासून हिप-पॉप सर्टिफिकेट कोर्सला सुरूवात होणार असून यासाठी नाव नोंदणी सुरू करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाची फी ५००० रूपये असणार असून फक्त शनिवार आणि रविवारी या दिवशी याचे वर्ग घेण्यात येणार आहेत.

मुंबई विद्यापीठात हिप-पॉप अभ्यासक्रम
SHARES

सध्या जगभरातील तरूणाईला हिप-पॉप स्टाईलनं वेडं लावलं आहे. या स्टाईलनं विविध गाणी, रॅप, आणि नृत्य करता यावं, हिप-पॉप कल्चर विद्यार्थ्याना शिकता यावं यासाठी मुंबई विद्यापीठात लवकरच हिप-पॉप अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे भारतात अशाप्रकारे हिप-पॉप अभ्यासक्रम सुरू करणारं मुंबई विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ आहे.


कसा असेल कोर्स

मुंबई विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातंर्गत (department of communication and journalism) हिप-पॉप अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार अाहे. हा सहा महिन्यांसाठी बेसिक सर्टिफिकेट कोर्स असणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास संचालक मंडळांतील प्रा. यतिंद्र इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० नोव्हेंबर २०१८ रोजी याबाबतचा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला असून यात हिप-पॉप कल्चरचा इतिहास, जगभरातील हिप-पॉप कल्चर, हिप-पॉप अभ्यासक्रम, त्यातील महत्त्वाच्या बाबी व इतर हिप-पॉप कल्चरचा अभ्यास विद्यार्थ्यांना शिकवला जाणार आहे. हा सर्टिफिकेट कोर्स केल्यानंतर म्युझियन, म्युझिक प्रोड्युसर, आर्टिस्ट मॅनेजमेंट, डिजे, रेडिओ-टिव्ही होस्ट यांसारख्या विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी प्राप्त होणार आहेत.  


क्रेडिट बेसिसवर

जगभरात हिप-पॉप अभ्यासक्रम क्रेडिट बेसिसवर असल्यानं मुंबई विद्यापीठानंही हा अभ्यासक्रम क्रेडिट बेसिसवर घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या अभ्यासक्रमाला एकूण सहा क्रेडिट देण्यात येणार असून प्रोजेक्ट २, हजेरी १, लेखी परीक्षा २, वर्गात विद्यार्थ्याचा सहभाग १ अशाप्रकारे याची विभागणी करण्यात आली आहे. 


जानेवारीत सुरू

येत्या जानेवारी महिन्यापासून हिप-पॉप सर्टिफिकेट कोर्सला सुरूवात होणार असून यासाठी नाव नोंदणी सुरू करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाची फी ५००० रूपये असणार असून फक्त शनिवार आणि रविवारी या दिवशी याचे वर्ग घेण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या अभ्यासक्रमाला मुंबईतील अनेक मुलांनी विचारणा केली असून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये धारावीत राहणाऱ्या मुलांची संख्या जास्त आहे. त्याशिवाय भारतात अशाप्रकारे हिप-पॉप अभ्यासक्रम सुरु करणारं मुंबई विद्यापीठ पहिलं विद्यापीठ असल्यानं दिल्ली, तमिळनाडू, गुजरात, नेपाळ यांसारख्या विविध ठिकाणाहून विद्यार्थी यासाठी उत्सुक असल्याचं दिसून येत आहे. हेही वाचा - 

विक्रोळीतील महापालिका शाळेत कुत्र्या-मांजराचा वावर

माहिती देण्यास टाळाटाळ, मुंबई विद्यापीठाला २५ हजारांचा दंड!
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा