Advertisement

विक्रोळीतील महापालिका शाळेत कुत्र्या-मांजराचा वावर

विक्रोळीतील महापालिकेच्या अनुदानित शाळेत १ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेच्या आवारात भटकी कुत्री आणि मांजरांच्या वावरामुळे विद्यार्थ्यांना शाळेत एकटं जाण्यास भीती वाटू लागली आहे. मात्र, या उपद्रवाकडे शाळेतील शिक्षक व अधिकारी गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा पालकांनी आरोप केला आहे.

विक्रोळीतील महापालिका शाळेत कुत्र्या-मांजराचा वावर
SHARES

विक्रोळीतील भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाच्या घटना ताज्या असतानाच आता महापालिका शाळांमध्ये कुत्र्या मांजरांचा वावर वाढल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं, तर पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. विक्रोळी येथील मनोहर कोतवाल ट्रस्ट माध्यमिक विद्यालयातील ही घटना असून, सुरक्षेसाठी पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.

शाळेचं दुर्लक्ष

विक्रोळीतील महापालिकेच्या अनुदानित शाळेत १ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेच्या आवारात भटकी कुत्री आणि मांजरांच्या वावरामुळे विद्यार्थ्यांना शाळेत एकटं जाण्यास भीती वाटू लागली आहे. मात्र, या उपद्रवाकडे शाळेतील शिक्षक व अधिकारी गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा पालकांनी आरोप केला आहे.

आंदोलनाचा इशारा

त्याशिवाय शाळेच्या आवारातच प्राण्यांचा मोकाट वावर वाढल्याने विद्यार्थ्यांचं आरोग्यही धोक्यात आलं आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांच्या पालकांनी महापालिका शिक्षण अधिकारी महेश पालकर यांची भेट घेतली आणि तक्रारींचे निवेदन त्यांना दिलं. याप्रश्‍नी महापालिकेने दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा महापालिका शिक्षण समिती सदस्य आणि युवा सेनेचे नेते साईनाथ दुर्गे यांनी दिला आहे.हेही वाचा-

माहिती देण्यास टाळाटाळ, मुंबई विद्यापीठाला २५ हजारांचा दंड!

शाळा शुल्कवाढीविरोधात एकट्या पालकाला तक्रार करता येणार नाहीसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा