Advertisement

पाटकर, खालसा काॅलेजांना स्वायत्तता

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नॅक मूल्यांकनात ३.५ पेक्षा जास्त गुण असलेल्या कॉलेजांना स्वायत्तता देण्याचं धोरण जाहीर केलं आहे. त्यानुसार ३.५ पेक्षा जास्त गुण असलेल्या राज्यातील ३६ कॉलेजांनी स्वायत्तता प्रक्रियेची सुरुवात केली आहे. यापैकी मुंबईतील १३ काॅलेजांना स्वायत्तता बहाल करण्यात आली असून ६ काॅलेज स्वायत्ततेच्या प्रतिक्षेत आहेत.

पाटकर, खालसा काॅलेजांना स्वायत्तता
SHARES

मुंबईतील आणखी दोन काॅलेजांना स्वायत्तता (autonomous) मिळाली आहे. गोरेगावमधील पाटकर वर्दे काॅलेज आणि माटुंग्यातील गुरूनानक खालसा काॅलेजांना केंद्रीय अनुदान आयोगाने स्वायत्ततेचा दर्जा दिला. या दोन काॅलेजांना पकडून मुंबईत आता एकूण १३ स्वायत्त काॅलेज तयार झाले आहेत.

विद्यार्थ्यांना फायदा

या निर्णयाचा फायदा पाटकर कॉलेजात शिकणाऱ्या सुमारे ७५००, तर खालसा कॉलेजात शिकणाऱ्या सुमारे ८००० विद्यार्थ्यांना होणार आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या काॅलेजांची व्याप्ती खूपच वाढल्याने आपल्यावरील भार हलका करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. स्वायत्ततेमुळे विद्यापीठावरील भार हलका होण्यास मदत मिळणार आहे.

'अशी' मिळते स्वायत्तता

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नॅक मूल्यांकनात ३.५ पेक्षा जास्त गुण असलेल्या कॉलेजांना स्वायत्तता देण्याचं धोरण जाहीर केलं आहे. त्यानुसार ३.५ पेक्षा जास्त गुण असलेल्या राज्यातील ३६ कॉलेजांनी स्वायत्तता प्रक्रियेची सुरुवात केली आहे. यापैकी मुंबईतील १३ काॅलेजांना स्वायत्तता बहाल करण्यात आली असून ६ काॅलेज स्वायत्ततेच्या प्रतिक्षेत आहेत.

रोजगाराभिमुख शिक्षणक्रम

या सर्व कॉलेजांना पहिल्या ५ वर्षांसाठी शैक्षणिक स्वायत्तता देण्यात आली आहे. यामुळे कॉलेजांना स्वत: चे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम ठरविण्यास मुभा मिळणार आहे.

हेही वाचा-

आणखी १० कॉलेजांना हवी स्वायत्तता

मुंबईतील आणखी २ कॉलेजांना स्वायत्त दर्जा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा