Advertisement

आणखी १० कॉलेजांना हवी स्वायत्तता

मुंबईतील आणखी १० कॉलेजांनी स्वायत्तता मिळावी यासाठी अर्ज केला आहे. यात नरसी मोनजी कॉलेज, एस.के. सोमैय्या कॉलेज, डी.जी.रूपारेल कॉलेज, आर.ए. पोद्दार. निर्मला निकेतन कॉलेज यांसारख्या नामांकित कॉलेजांचा समावेश आहे.

आणखी १० कॉलेजांना हवी स्वायत्तता
SHARES

मुंबई विद्यापीठाशी संलग्न १३ कॉलेजांना स्वायत्तता मिळाल्यानंतर आणखी १० कॉलेजांनी स्वायत्तता मिळावी यासाठी अर्ज केला आहे. यात नरसी मोनजी कॉलेज, एस.के. सोमैय्या कॉलेज, डी.जी.रूपारेल कॉलेज, आर.ए. पोद्दार. निर्मला निकेतन कॉलेज यांसारख्या नामांकित कॉलेजांचा समावेश आहे. विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) च्या नव्या नियमावलीमुळं कॉलेजांच्या स्वायत्ततेसाठीच्या अर्जात वाढ होण्याची शक्यता आहे.


स्वायत्ततेची गरज का?

सध्या मुंबई विद्यापीठाशी सुमारे ७५० कॉलेज संलग्न असून विद्यापीठाच्या कारभाराचा डोलारा खूप वाढला आहे. यातील काही कॉलेजांना स्वायत्तता मिळाल्यावर हा भार हलका होऊ शकतो. स्वायत्ततेचा दर्जा मिळाल्यानंतर शैक्षणिक संस्थांना अभ्यासक्रम ठरवण्यापासून परीक्षा घेण्यापर्यंतची स्वायत्तता मिळते. परंतु आर्थिक स्वायत्तता मिळण्यासाठी कॉलेजांना आणखी ५ वर्षे वाट पाहावी लागते.


नव्या नियमाचा फायदा

यूजीसीने काही महिन्यांपूर्वीच कॉलेजांना देण्यात येणाऱ्या स्वायत्त दर्जाच्या नियमांमध्ये बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्यानुसार ज्या कॉलेजांना नॅकचं 'ए' मूल्यांकन प्राप्त आहे आणि ज्यांनी ३.५१ सीजीपीए ( Cumulative Grade Point Average) पूर्ण केलं आहे, अशा कॉलेजांवर कोणतीही समिती न पाठविता स्वायत्तता देण्याचं निश्चित केलं होतं. विद्यापीठ अनुदान आयोगानं स्वायत्तेची प्रक्रिया सुलभ केल्याने अर्ज करणाऱ्या कॉलेजांची संख्या वाढणार आहे.


'असा' होता पूर्वीचा नियम

हा नियम लागू होण्यापूर्वी कॉलेजांना सलग ३ वेळा नॅकचा 'अ' दर्जा मिळल्यानंतरच ते स्वायत्ततेसाठी अर्ज करू शकतं होते. तसंच विद्यापीठाची एक समिती त्या कॉलेजांची पाहणी करून मग स्वायत्तता द्यायची की नाही, याचा प्रस्ताव आयोगाकडे पाठवत होती. मात्र नवीन नियमांनुसार ज्या कॉलेजांना आता नॅकचं मूल्यांकन ३.५१ मिळालेली कॉलेज थेट आयोगाकडे अर्ज करू शकणार आहेत.हेही वाचा-

मुंबईतील आणखी २ कॉलेजांना स्वायत्त दर्जा

उच्च शिक्षण संस्थांसाठी रुसाकडून ३४० कोटीRead this story in English
संबंधित विषय