Advertisement

मुंबईतील आणखी २ कॉलेजांना स्वायत्त दर्जा

केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) ने शुक्रवारी सायन येथील एस.आय.ई.एस कॉलेज आणि शनिवारी घाटकोपर रामनिरंजन झुनझुनवाला या कॉलेजांना स्वायत्त कॉलेजचा दर्जा जाहीर केला.

मुंबईतील आणखी २ कॉलेजांना स्वायत्त दर्जा
SHARES

सायन मधील एस.आय.ई.एस कॉलेज आणि घाटकोपर मधील रामनिरंजन झुनझुनवाला कॉलेज या मुंबईतील २ कॉलेजांना स्वायत्त दर्जा मिळाला आहे. केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) ने शुक्रवारी सायन येथील एस.आय.ई.एस कॉलेज आणि शनिवारी घाटकोपर रामनिरंजन झुनझुनवाला या कॉलेजांना स्वायत्त कॉलेजचा दर्जा जाहीर केला. यामुळे आता मुंबई विद्यापीठाच्या संलग्नित स्वायत्त कॉलेजांची संख्या १६ झाली आहे.


स्वायत्तेचं वैशिष्ट्य काय?

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असणाऱ्या स्वायत्त कॉलेजांना त्यांचा अभ्यासक्रम व शिक्षणक्रम ठरविण्याचे स्वातंत्र्य दिल जात. तसंच नवीन अभ्यासक्रम आणि परीक्षांबाबतही स्वातंत्र्य मिळतं. युजीसीने घेतलेल्या या निर्णयानुसार रामनिरंजन झुनझुनवाला कॉलेजला २०२७-२८ या शैक्षणिक वर्षापर्यंत स्वायत्त दर्जा प्राप्त झाला असून या कॉलेजला ५५ वर्षांची परंपरा आहे. विशेष म्हणजे या कॉलेजला नॅक मूल्यांकनाचा 'ए' दर्जा प्राप्त असून हिंदुस्तान युनिलिव्हर, डीबीटी, आयसीएमआर, यूजीसी यांच्या शोध प्रकल्पांना निधीही मिळत आहे.२०१४ मध्ये यूजीसीच्या 'बी' व्होकेशनल अभ्यासक्रमासाठी काॅलेजला १ कोटी ५ लाखांचं अनुदानही दिलं होतं. हे अनुदान शहरातील मोजक्याच काॅलेजांना मिळालं असून झुनझुनवाला कॉलेज त्यापैकी एक आहे. अभ्यासक्रम अधिकाधिक सोपा करता यावा यासाठी अधिक दर्जात्मक मूल्यांकन प्रक्रिया करण्यावर भर देण्यात येणार आहे.
- उषा मुकुंदन, प्राचार्या, झुनझुनवाला कॉलेज


विशेष अनुदान

एस.आय.ई.एस कॉलेजला देखील २०२७-२८ पर्यंत स्वायत्त दर्जा मिळाला आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात या कॉलेजला स्टार दर्जा तसेच, फंड फॉर इंप्रुव्हमेंट ऑफ सायन्स अॅड टेक्नॉलॉजी इनफ्रास्ट्रक्चर (FIST) हे विज्ञान व तंत्रज्ञान खात्यातंर्गत देण्यात येणारं ९५ लाखांचं विशेष अनुदानही प्राप्त झालं होतं.यूजीसीतर्फे मिळालेल्या स्वायत्ततेच्या माध्यमातून कॉलेज आता विद्यार्थीभिमुख उपक्रम अधिक जोमाने राबवू शकणार आहे. तसंच स्वायत्ततेतंर्गत त्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठीही कॉलेज प्रयत्नशील असणार आहे. सुरू असलेल्या उपक्रमांसोबतच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या अनुषंगानेही काही विशेष उपक्रम येत्या काळात सुरु करण्याचा कॉलेजचा प्रयत्न असेल.
- डॉ. उमामहेश्वरी शंकर, प्राचार्या, एसआयईएस काॅलेज


नव्या नियमाचा फायदा

यूजीसीने काही महिन्यांपूर्वीच कॉलेजांना देण्यात येणाऱ्या स्वायत्त दर्जाच्या नियमांमध्ये बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्यानुसार ज्या कॉलेजांना नॅकचं 'ए' मूल्यांकन प्राप्त आहे आणि ज्यांनी ३.५१ सीजीपीए ( Cumulative Grade Point Average) पूर्ण केलं आहे, अशा कॉलेजांवर कोणतीही समिती न पाठविता स्वायत्तता देण्याचे निश्चित केलं आहे.

तसंच जी कॉलेज या प्रस्तावावर एका महिन्यात कार्यवाही करणार नाहीत त्या प्रस्तावाला मंजुरी असल्याचं ग्राह्य धरण्यात येणार असल्याचा नवा नियम यूजीसीने जाहीर केला आहे. या नियमाच्या अनुषंगाने वरील दोन्ही कॉलेजांना स्वायत्तता जाहीर करण्यात आली आहे.हेही वाचा-

एमएचटी- सीईटी परीक्षेत मुंबईतून कौशल राठी टॉपर

१२वी फेरपरीक्षेच्या अर्जाची तारीख जाहीरRead this story in English or हिंदी
संबंधित विषय