Advertisement

एमएचटी- सीईटी परीक्षेत मुंबईतून खुशाल राठी टॉपर

राज्यातील इंजिनीअरिंग, फार्मसी आणि कृषीविषयक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल शनिवारी रात्री जाहीर झाला. या परीक्षेत भाईंदरच्या खुशाल विनोद राठी या विद्यार्थ्याने मुंबईतून प्रथम आला.

एमएचटी- सीईटी परीक्षेत मुंबईतून खुशाल राठी टॉपर
SHARES

राज्यातील इंजिनीअरिंग, फार्मसी आणि कृषीविषयक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल शनिवारी रात्री जाहीर झाला. या परीक्षेत भाईंदरच्या खुशाल विनोद राठी या विद्यार्थ्याने मुंबईतून प्रथम तर राज्यातून दुसरा येण्याचा मान मिळवला. त्याला पीसीएम गटातून २०० पैकी १९१ गुण मिळाले आहेत.


'हे' आहेत एमएचटी-सीईटी टॉपर

या परीक्षेत पीसीबी गटात अभिजीत कदम या विद्यार्थ्यांने २०० पैकी १८८ गुण मिळवत राज्यात पहिला क्रमांक पटकावला. तर आदित्य अभंग या विद्यार्थ्याने पीसीएम गटातून २०० पैकी १९५ गुण मिळत राज्यात पहिला क्रमांक मिळवला. त्याशिवाय 'पीसीबी' गटातील मागासवर्गीय उमदेवारांमधून प्रशांत वायाळ याने २०० पैकी १८२ गुण मिळवत प्रथम येण्याचा मान पटकावला. सोबतच, 'पीसीबी' गटातून जान्हवी मोकाशी हिने २०० पैकी १८३ गुण मिळवत तर 'पीसीएम' मध्ये मोना गांधी हिने १८९ गुण मिळवित मुलींमधून प्रथक क्रमांक पटकावला आहे.


एमएचटी-सीईटी या परीक्षेत मला १९१ गुण मिळाले असून मला निकाल पाहिल्यावर खूप आनंद झाला. मी जवळपास १० तासांपेक्षा जास्त वेळ अभ्यास केला. माझ्या या यशात द सायन्स प्रायव्हेट हब या कोचिंग क्लासचाही हातभार आहे. सीईटी परीक्षा देण्याची ही माझी पहिलीच वेळ होती.
- खुशाल विनोद राठी, मुंबईतील टॉपर


खुशालने ११ वी आणि १२ वीची परीक्षा देत असतानाच अथक परिश्रम घेऊन जेईई मेन-अॅडव्हान्स आणि एमएचटी-सीईटी यांसारख्या विविध स्पर्धा परीक्षा दिल्या. त्या परीक्षेत खुशालने उत्तम परफॉर्मन्स दिला असून आताच्या एमएचटी-सीईटी परीक्षेत त्याच्या २ वर्षांच्या मेहनतीचं फळ त्याला प्राप्त झालं आहे. तो पहिल्यापासूनच मेहनती असल्याने आम्हाला त्याच्यावर फार वेळ खर्च करावा लागला नाही, त्याला आम्ही फक्त व्यवस्थित मार्गदर्शन करण्याचं काम केलं.
- हितेश बेचरा, (द सायन्स प्रायव्हेेट हब) भाईंदर, को-फाऊंडर-शिक्षक


सीईटी विद्यार्थ्यांना दिलासा

राज्य सीईटी सेलतर्फे राज्यातील ३६ जिल्ह्यांतील १२६० परीक्षा केंद्रांवर सीईटी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी ४ लाख ३५ हजार ६०६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९६.२८ म्हणजेच ४ लाख १९ हजार ४०८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. हा निकाल ४ जून रोजी जाहीर करण्यात येणार होता. मात्र सीईटी सेलतर्फे शनिवारी रात्रीच या निकालाची घोषणा करीत राज्यातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


गुण
पीसीएम विद्यार्थी
पीसीबी विद्यार्थी
२०० ते १७६
२५७
२७७
१७५ ते १५१
२३८२
३०३६
१५० ते १२६
६१०८
९५६३
१२५ ते १०१
१३३२६
२३१९१
१०० ते ५१
२११६२३
३२१९९१
५० हून कमी
६२९२२
५९५७७

 


हेही वाचा-

बारावीच्या दृष्टीहीन विद्यार्थ्यांची दूरदृष्टी

१२वी फेरपरीक्षेच्या अर्जाची तारीख जाहीर



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा