Advertisement

बारावीच्या दृष्टीहीन विद्यार्थ्यांची दूरदृष्टी

शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या कमोजरीवर मात करून अभ्यास करावा लागतो आणि त्यांनी वर्षभर केलेल्या या परिश्रमाचं फळ त्यांना नक्कीच प्राप्त होतं, असंच काहीसं घडलं आहे ते सुक्रता, धनश्री आणि ललितासोबत..

बारावीच्या दृष्टीहीन विद्यार्थ्यांची दूरदृष्टी
SHARES

बारावीचं वर्ष सुरू झालं की पालक मुलांच्या अभ्यासाव्यतिरिक्त इतर सगळ्या उपक्रमांना वर्षभरासाठी विश्रांती देतात. आपल्या मुलाचा पूर्ण वेळ अभ्यासात जावा यासाठी ते त्याला सर्व सुखसोयी पुरवत असतात. पण शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या कमोजरीवर मात करून अभ्यास करावा लागतो आणि त्यांनी वर्षभर केलेल्या या परिश्रमाचं फळ त्यांना नक्कीच प्राप्त होतं, असंच काहीसं घडलं आहे ते सुक्रता, धनश्री आणि ललितासोबत...


सुकृता सुरेश लोटलीकर या दृष्टिहीन विद्यार्थिनीला बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळालं आहे. सेंट झेविर्यस कॉलेजच्या कला शाखेतील सुकृता ही दृष्टीहीन आहे. असं असतानाही तिने बारावीत ८२ टक्के गुण मिळवले. 

मला माझ्या अभ्यासात कॉलेजद्वारे भरपूर मदत करण्यात आली, त्यांनी मला अभ्यास करण्यासाठी मॅग्नीफाय ग्लासही दिला असल्याने मी त्याद्वारेच माझा ७० टक्के अभ्यास केला. मी पुढे बीए करणार असून, मला भविष्यात आय. ए. एस ऑफिसर बनण्याची इच्छा आहे. माझ्या आतापर्यंत अभ्यासात मला बाबांनी सर्वोत्परी मदत केली असल्याने माझ्या यशाचं श्रेय मी बाबांना देऊ इच्छिते.
-सुकृता सुरेश लोटलीकर, विद्यार्थिनी


ललिताने मिळवले 70 टक्के

सुकृताप्रमाणेच ललिता पवार या विद्यार्थीनेही कॉमर्स क्षेत्रातून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली असून तिला ७० टक्के गुण मिळाले आहेत. ललिता ही लो व्हिजन असल्याने तिनं बारावीचा अभ्यास यूट्युब, रेकॉर्ड आणि ब्रेल नोट्सद्वारे केला. तसेच तिचे परीक्षेच्या काळात ऑपरेशनही झाल्याने तिला अभ्यासात काही प्रमाणात अडचणीही आल्या. परंतु, त्या सर्व अडचणींवर मात करत तिने बारावीच्या परीक्षेत चांगलं यश संपादन केलं. तिला बी. कॉम क्षेत्रात करीअर करायचं असून ती तिच्या गावातून बारावी उत्तीर्ण होणारी पहिलीच मुलगी आहे. 


अंंधत्वावर केली मात


धनश्री गावंडे या विल्सन कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीनेही आपल्या अंधत्वावर मात करत ७३ टक्के गुण मिळवले आहेत. कॉलेजमधील मित्रांकडून नोट्स घेऊन, ब्रेल कोड पद्धतीच्या पुस्तकातून विविध विषयांचा रोजच्या रोज अभ्यास करण्यावर धनश्रीने भर दिला. त्याशिवाय तिला तिच्या भावानेही वेळोवेळी मदत केली असून तिला पत्रकार होण्याची इच्छा आहे. धनश्री पुढील शिक्षणाकरता बी. ए इन सोशोलॉजीकरता अॅडमिशन घेणार आहे.

त्याशिवाय या तिघींनीही सामान्य विद्यार्थ्यांपेक्षा आमच्यावर अधिक मेहनत घेणारे शिक्षक, नेहमी मदत करणारे मित्र आणि कुटुंबातील सदस्य यांच्यामुळेच आज आम्ही इतके गुण मिळवू शकलो अशी भावूक प्रतिक्रियाही मुंबई लाइव्हला दिली.



हेही वाचा - 

मुंबईची पोरं हुश्शार....बारावीच्या परीक्षेत नव्वदीपार

एफवाय प्रवेशाला १ जूनपासून सुरूवात

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा