Advertisement

एफवाय प्रवेशाला १ जूनपासून सुरूवात

. मुंबई विद्यापीठ प्रशासनाने संलग्नित कॉलेजांसाठीची प्रवेश प्रक्रिया जाहीर केली असून शुक्रवार १ जूनपासून प्रवेशाला सुरूवात होणार आहे. विद्यापीठाने यंदाही प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी सक्तीची केली आहे.

एफवाय प्रवेशाला १ जूनपासून सुरूवात
SHARES

राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या बारावी बोर्डाच्या निकालानंतर आता सर्वांचं लक्ष एफवायच्या प्रवेश प्रक्रियेकडे लागलं आहे. मुंबई विद्यापीठ प्रशासनाने संलग्नित कॉलेजांसाठीची प्रवेश प्रक्रिया जाहीर केली असून शुक्रवार १ जूनपासून प्रवेशाला सुरूवात होणार आहे. विद्यापीठाने यंदाही प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी सक्तीची केली असून विद्यापीठाच्या mum.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर ही नोंदणी करता येणार आहे.


'या' अभ्यासक्रमांकरीता प्रवेशपूर्व नोंदणी आवश्यक

मुंबई विद्यापीठाने जाहीर केलेल्या प्रवेश प्रक्रियेनुसार शैक्षणिक वर्ष २०१८-१९ साठी मुंबई विद्यापीठाने प्रथमवर्ष बी.ए, बी.एस्सी, बी.कॉम, बी.एमएमएम, बी.एसडब्ल्यू, बीए (फ्रेंच स्टडी, जर्मन स्टडी), बॅचलर ऑफ कलिनरी आर्ट, बीए-एमए (इंटिग्रेटेड कोर्स इन जर्मन स्टडी), बीएमएस, बीएमएस-एमबीए (पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) , बीकॉम (फायनांन्शियल मार्केट), बीकॉम (अकाऊंटींग अँड फायनांन्स), बीकॉम ( बँकिंग अँड इन्शुअरन्स), बीकॉम (फायनांन्शिअल मॅनेजमेंट), बीकॉम (इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट), बीकॉम (ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट),

यासोबत बीएस्सी (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), बीएस्सी (कॉम्प्युटर सायन्स), बीएस्सी (हॉस्पिटॅलिटी स्टडी), बीएस्सी (मायक्रोबायोलॉजी), बीएस्सी (बायो-केमेस्ट्री), बीएस्सी (बायो-टेक्नॉलॉजी), बीएस्सी (मेरिटाईम), बीएस्सी (नॉटीकल सायन्स), बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बीएस्सी (होम सायन्स), बीएस्सी (एरॉनॉटिक्स), बीएस्सी (एव्हीएशन), बीएस्सी (ह्युमन सायन्स), बीव्होक (टी अँड एचएम, आरएम, एफएम अँड एस, आरईएम, एमपी, एमएलटी, ग्रीन हाऊस मॅनेजमेंट, फार्मा अॅनेलिटिकल सायन्स, टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट) आणि लायब्ररी सायन्स अशा अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी अनिवार्य आहे


ऑनलाइनचा विद्यार्थ्यांना फायदा

प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणीचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार असून या प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्याला पीआरएन(PRN) नंबर लवकर प्रदान केला जातो. त्यामुळे परीक्षेचा फॉर्म भरताना सर्व अद्ययावत माहिती विद्यार्थ्यांला उपलब्ध होते. त्याआधारे विद्यार्थ्याला हॉलतिकिट किंवा गुणपत्रिका ऑनलाइन माध्यमाने उपलब्ध करुन दिली जाते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या पात्रता आणि नोंदणीची प्रक्रिया अधिक जलद गतीने व सुलभरित्या केली जाते.



अर्ज भरताना घ्यायची काळजी

  1. प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी कॉलेजमधून प्रवेश अर्ज व माहिती पुस्तिका खरेदी करून माहिती पुस्तिकेनुसार विषय व विषयसमूहाप्रमाणेच (Combination) विषय निवडणं बंधनकारक आहे.
  2. प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी मल्टिकॉलेजेस, मल्टिकोर्ससाठी (प्रोग्राम) करता येईल.
  3. विद्यार्थ्यांनी शिक्षणक्रमनिहाय नोंदणी अर्जाची प्रत काढून ती संबंधित कॉलेजांमध्ये प्रवेशाच्या विहित प्रक्रियेसाठी योग्य दस्ताऐवजासह सादर करावी.
  4. प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणीठी स्वतःचा स्कॅन केलेला फोटो आणि स्वाक्षरीची सॉफ्ट कॉपी सोबत असणं आवश्यक आहे.
  5. प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणीसाठी विद्यार्थ्याचा स्वतःचा ई-मेल व मोबाइल क्रमांक आवश्यक आहे.
  6. दहावी आणि बारावीच्या गुणपत्रिका सोबत ठेवाव्यात.
  7. विद्यार्थ्याचे शिक्षणक्रमांचे विषय अंतिम करण्याचे अधिकार कॉलेजांच्या प्राचार्यांना असतील याची नोंद घ्यावी.
  8. स्वायत्त कॉलेजातील प्रवेश प्रक्रियेबाबतचे नियम व अधिकार विद्यापीठ व शिखर संस्थांच्या नियमास अधीन राहून कॉलेजांच्या प्रचलित नियमाप्रमाणे असतील.
  9. प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी ही नमूद केलेल्या कालावधीत होणं गरजेचं आहे.
  10. विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन प्रवेश नोंदणी अर्जाची प्रत असल्याशिवाय महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकणार नाहीत.


ऑनलाइन अर्ज कसा करावा?

  1. विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम mum.digitaluniversity.ac संकेतस्थळावर Mumbai University Pre Admission online Registration 2018-19 या लिंकवर क्लिक करावं. ही लिंक १ जून २०१७पासून सुरू करण्यात येईल.
  2. एकदा अचूक माहिती भरल्यावर दाखल केलेला मोबाइल क्रमांक आणि ई-मेलवर यूझर आयडी आणि पासवर्ड पाठवला जाईल.
  3. यूजर आयडी आणि पासवर्ड मिळताच विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम स्वतः बद्दलच्या माहितीची खातरजमा करावी. या विद्यार्थ्यांना पासवर्ड बदलण्याची मुभा देण्यात आली आहे.
  4. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या यूजर आयडी आणि पासवर्ड किंवा बदलेल्या पासवर्डच्या मदतीने सर्वप्रथम स्वतः बद्दलची माहिती, शैक्षणिक गुणवत्ता, इ.माहिती भरायची आहे.
  5. त्यानंतर स्कॅन केलेला फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करायची आहे.
  6. नतंर Confirm Profile वर क्लिक करून माहितीची खातरजमा करता येईल.
  7. ऑनलाईन प्रवेश नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये नमूद केलेला शिक्षणक्रम विद्यार्थ्यांना निवडायचा असून त्यासोबतच विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालये त्यांनी निवडायचं आहेत.
  8. एकदा पूर्ण आणि अचूक माहिती भरल्याची खातरजमा करुन भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट घेऊन संबंधित महाविद्यालयात सादर करायची आहे.


प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया

  • अर्जविक्री : ३१ मे २०१८ ते ०९ जून २०१८ पर्यंत (कार्यालयीन दिवस)
  • प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया : १ जून २०१८ ते ११ जून २०१८
  • प्रवेश अर्जाची प्रिंट घेऊन कॉलेजात सादर करण्याची तारीख : ७ जून २०१८ ते १२ जून २०१८ (दुपारी १२.०० वाजेपर्यंत, कार्यालयीन दिवस ) (प्रवेशपूर्व नोंदणी अर्ज आवश्यक) इन हाऊस अॅडमिशन आणि अल्पसंख्याक कोटा प्रवेश या कालावधीत करता येईल.
  • पहिली मेरीट लिस्ट : १२ जून २०१८ ( सायंकाळी ५.०० वाजता)
  • कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणं : १३ जून २०१८ ते १५ जून २०१८ (सायं. ४.३० वाजेपर्यंत (कार्यालयीन दिवस)
  • दुसरी मेरीट लिस्ट : १५ जून २०१८ ( सायं. ५.०० वा.)
  • कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणं : १८ जून २०१८ ते २० जून २०१८ ( सायं. ४.३० वाजेपर्यंत (कार्यालयीन दिवस )
  • तिसरी आणि शेवटची मेरीट लिस्ट : २० जून २०१८
  • कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणं : २१ जून २०१८ ते २५ जून २०१८ ( सायं. ५.०० वाजेपर्यंत (कार्यालयीन दिवस )



हेही वाचा-

Maharashtra HSC Result : बारावी बोर्डाचा निकाल जाहीर, येथे पाहा निकाल

मुंबईची पोरं हुश्शार....बारावीच्या परीक्षेत नव्वदीपार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा