Advertisement

मुंबईची पोरं हुश्शार....बारावीच्या परीक्षेत नव्वदीपार

बारावी बोर्डाचा निकाल ३० मे रोजी १ वाजेच्या सुमारास जाहीर झाला. यंदा मुंबईच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं आहे. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात मुंबई विभागातील जवळपास २ हजार २८८ विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा जास्त टक्केवारी प्राप्त केली आहे.

मुंबईची पोरं हुश्शार....बारावीच्या परीक्षेत नव्वदीपार
SHARES

संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेला राज्य शिक्षण मंडळाचा बारावी बोर्डाचा निकाल ३० मे रोजी १ वाजेच्या सुमारास जाहीर झाला. यंदा मुंबईच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं आहे. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात मुंबई विभागातील जवळपास २ हजार २८८ विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा जास्त टक्केवारी प्राप्त केली आहे.


मुंबईचा निकाल ८७.४४ टक्के

यंदा बारावीचा मुंबई विभागाचा निकाल ८७.४४ टक्के इतका लागला असून २ लाख ७२ हजार ५१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान मुंबई विभागातून ३ लाख ११ हजार ८८८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.


मुंबई अव्वल स्थानावर

बारावीच्या परीक्षेतील मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागांच्या निकालामध्ये मुंबईच्या पोरांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. बारावीच्या निकालात विज्ञान शाखेच्या १४०, कला शाखेतील ३५,वाणिज्य शाखेतील ११६ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.


इतक्या विद्यार्थ्यांना ९० पेक्षा जास्त टक्के

नुकत्याच मिळालेल्या आकडेवारीनुसार मुंबई विभागातील जवळपास २ हजार २८८ विद्यार्थ्यांना ९० पेक्षा जास्त टक्के मिळाले आहे. दरम्यान मुंबईनतंर पुणे विभागातील ७९० विद्यार्थी, तर नागपूर विभागातील ६९८ विद्यार्थ्यांना ९० पेक्षा जास्त टक्केवारी प्राप्त झाली आहे.


हेही वाचा -

Maharashtra HSC Result : बारावी बोर्डाचा निकाल जाहीर, येथे पाहा निकाल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा