Advertisement

उच्च शिक्षण संस्थांसाठी रुसाकडून ३४० कोटी

२५ मे रोजी दिल्लीमध्ये पार पडलेल्या केंद्रीय रुसाच्या बैठकीमध्ये केंद्र शासनाकडून महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाच्या संस्थांना ३४० कोटी रुपयांचं अनुदान मंजूर करण्यात आलं आहे. संपूर्ण भारतामध्ये स्वायत्त महाविद्यालयांना विद्यापीठाचा दर्जा फक्त तीन महाविद्यालयांना देण्यात येणार होता. तसेच प्रत्येक महाविद्यालयासाठी ५५ कोटी रुपये अनुदान देण्याची योजना होती.

उच्च शिक्षण संस्थांसाठी रुसाकडून ३४० कोटी
SHARES

महाराष्ट्रातील उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांना महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान परिषद रुसाने ३४० कोटी रुपयांचं अनुदान मंजूर केलं आहे.


३४० कोटींचं अनुदान मंजूर

२५ मे रोजी दिल्लीमध्ये पार पडलेल्या केंद्रीय रुसाच्या बैठकीमध्ये केंद्र शासनाकडून महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाच्या संस्थांना ३४० कोटी रुपयांचं अनुदान मंजूर करण्यात आलं आहे. संपूर्ण भारतामध्ये स्वायत्त महाविद्यालयांना विद्यापीठाचा दर्जा फक्त तीन महाविद्यालयांना देण्यात येणार होता. तसेच प्रत्येक महाविद्यालयासाठी ५५ कोटी रुपये अनुदान देण्याची योजना होती. या योजनेतंर्गत महाराष्ट्रातील फर्ग्युसन महाविद्यालय हे भारतातील पहिल्या तीन संस्थांमधील मानकरी ठरलं आहे.


विनोद तावडेंनी दिली माहिती

रुसा परिषदने काही दिवसांपूर्वी बृहत आराखडा तयार केला होता. या आराखड्यामध्ये महाविद्यालयांची स्वायत्तता, स्वायत्त महाविद्यालयांना विद्यापीठाचा दर्जा देणे, महाविद्यालयांच्या गटाला क्लस्टर विद्यापीठाचा दर्जा देणे, नवीन संशोधन, नवीन उपक्रम राबवणे, अध्ययन, अध्यापनाच्या पद्धतीतील गुणवत्ता वाढ मूल्यमापनाच्या नवनवीन पद्धतींवर भर देण्यात आल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी २९ मे रोजी दिली.

यंदा प्रथमच विद्यापीठ आणि महाविद्यालयांना स्पर्धेच्या स्वरुपात (चॅलेंजलेव्हल फंडिग) ऑनलाईन सहभाग नोंदवण्याची संधी मिळाली आहे.


चॅलेंज लेव्हल फंडिंग 4 घटकांमध्ये

  • स्वायत्त महाविद्यालयांना विद्यापीठाचा दर्जा
  • महाविद्यालयांच्या गटाला क्लस्टर विद्यापीठाचा दर्जा
  • स्वायत्त महाविद्यालयांचा दर्जा उंचावण्यासाठी
  • पायाभूत सुविधांसाठी अनुदान


'या' महाविद्यालयांना विद्यापीठाचा दर्जा

स्वायत्त महाविद्यालयांना विद्यापीठाचा दर्जा देण्याच्या योजनेमध्ये पहिल्या ६ महाविद्यालयांपैकी महाराष्ट्रातील चार महाविद्यालयांचा समावेश करण्यात आला आहे. त्यातील अन्य ३ महाविद्यालयांमध्ये मुंबईतील सेंट झेवियर्स, सिंबियोसिस महाविद्यालय व मिठीबाई महाविद्यालय यांचाही समावेश असून सध्या या महाविद्यालयांना प्रतिक्षा यादीत ठेवण्यात आले आहे, असे तावडे यांनी प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून सांगितले आहे.


राज्याचा हा प्रस्ताव मान्य

३ ते ४ महाविद्यालयांच्या एकत्रिक समूहाला विद्यापीठाचा दर्जा देण्याच्या प्रस्तावामध्ये रुसाच्या दुसऱ्या टप्प्यात भारतातून एकही प्रस्ताव सादर करण्यात आला नाही. तर रुसाच्या पहिल्या टप्प्यात अंतर्गत महाराष्ट्र राज्याचा समूह विद्यापीठाचा सुधारित प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. या समूह विद्यापीठामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हे अग्रणी (लीड) महाविद्यालय असेल आणि इतर सहभागी महाविद्यालयांमध्ये सिडनहॅम महाविद्यालय, एल्फिन्स्टन महाविद्यालय, शासकीय शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा समावेश आहे. दरम्यान या समूहाला विद्यापीठाला डॉ. होमी भाभा समूह विद्यापीठ असं नाव देण्यात आलं असून, यासाठी केंद्र सरकारकडून ५५ कोटी रुपयांचं अनुदान मंजूर करण्यात आल्याची माहिती विनोद तावडे यांनी दिली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा