आयआयटीच्या प्लेसमेंटमध्ये ११२२ विद्यार्थ्यांची नोकरी पक्की

दरवर्षीप्रमाणे यंदाही आयआयटीच्या कॅम्पसमध्ये प्लेसमेंट ऑफर देणाऱ्या कंपन्यांकडून इंटरव्ह्यू घेण्यात आले. यंदा प्लेसमेंट ऑफर देण्यासाठी कॅम्पसमध्ये ३६१ कंपन्या आल्या होत्या.

SHARE

देशभराचं लक्ष लागलेल्या आयआयटी मुंबईतील कॅम्पस प्लेसमेंटचा पहिल्या टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे. १ ते १७ डिसेंबरपर्यंत घेण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यात १ हजार २७० ऑफर्स देण्यात आल्या होत्या. यातील १ हजार १२२ ऑफर्स विद्यार्थ्यांनी स्वीकारल्या असून गेल्या ३ वर्षांतील हा उच्चांकी आकडा आहे.


३६१ कंपन्यांचा सहभाग

आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी आपल्या संस्थेत येऊन काम करावं, अशी अनेक कंपन्यांची अपेक्षा असते. यामुळेच दरवर्षीप्रमाणे यंदाही आयआयटीच्या कॅम्पसमध्ये प्लेसमेंट ऑफर देणाऱ्या कंपन्यांकडून इंटरव्ह्यू घेण्यात आले. यंदा प्लेसमेंट ऑफर देण्यासाठी कॅम्पसमध्ये ३६१ कंपन्या आल्या होत्या.


सर्वाधिक ४५ लाखांचं वेतन

यापैकी सॅमसंग या कंपनीनं विद्यार्थ्यांना सर्वाधिक २७ ऑफर्स देऊ केल्या असून कोरिया, बंगळुरू, नोएडा आणि दिल्ली येथील कार्यालयात या नोकऱ्या असणार आहेत. त्यानंतर मायक्रॉन सेमिकंडक्टर या कंपनीने २४, पीडब्लूसी या कंपीनने २१, मायक्रोसॉफ्टने १९ तर गोल्डमन सॅकने १७ ऑफर्स विद्यर्थ्यांना दिल्या आहेत. यंदा १७ लाख ७५ हजार रुपयांचं सरासरी वार्षिक वेतन विद्यार्थ्यांना देण्यात आलं असून सर्वाधिक वेतन ४५ लाख रुपये इतकं देण्यात आलं आहे.


आंतरराष्ट्रीय कंपन्यांचाही समावेश

यंदा सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनीही यात सहभाग नोंदवला असून पहिल्या दिवशी २०० ऑफर्स देण्यात आल्या असून यातील १८३ ऑफर्स स्वीकारण्यात आल्या. तर दुसऱ्या दिवशी २३७ ऑफर्स देण्यात आल्या असून यातील २१० स्वीकारण्यात आल्या. यंदा आंततराष्ट्रीय कंपन्यांनीही या प्लेसमेंटमध्ये सहभाग नोंदवला होता. यातील सर्वाधिक वेतन १ लाख ६४ हजार अमेरिकन डॉलर्स आहे.

वर्ष - स्वीकारलेल्या ऑफर्स

२०१६-१७ - १००८

२०१७-१८ - १०२३

२०१८-१९ - ११२२हेही वाचा-

मुंबई विद्यापीठाच्या निकालांत पुन्हा घोळ? ७६, ८२८ पुनर्मूल्यांकन अर्ज दाखल

मराठीच्या गुणवत्ता वाढीसाठी ३०० शाळांमधील शिक्षक एकवटलेसंबंधित विषय
ताज्या बातम्या